शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून वसतिगृहाचे बांधकाम सुरूच

By admin | Updated: May 15, 2016 00:21 IST

आयुष्य संपलेल्या इमारतीत शासकीय मुलींचे वसतिगृह भाड्याने सुरू आहे.

तुमसरातील प्रकार : ८ कोटीपैकी ३.५० कोटी रूपये मिळालेतुमसर : आयुष्य संपलेल्या इमारतीत शासकीय मुलींचे वसतिगृह भाड्याने सुरू आहे. आदिवासी विभागातर्फे तुमसर शहरात मुला-मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. आदिवासी मंत्रालयाने आतापर्यंत केवळ ३ कोटी ५० लक्षाचा निधी दिला. उर्वरित पाच कोटीच्या निधीची येथे प्रतीक्षा आहे. या वसतीगृह इमारतीच्या बांधकामावर राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी दोनदा भेट दिली हे विशेष.तुमसर शहरात रेल्वे स्थानकाजवळ मागील दोन वर्षापासून मुलामुलींचे वसतिगृह इमारतीचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. मुले ७५ व मुली ७५ अशी क्षमता या वसतिगृहाची आहे. राज्य शासनाने वसतिगृहाकरिता ३ कोटी ५० लक्षाचा निधी दिला आहे. उर्वरित ५ कोटी निधीची अजून प्रतिक्षा आहे. वसतिगृहाचे बांधकाम निधीअभावी अपूर्णावस्थेत आहे. वसतिगृह बांधकामासंदर्भात अनेकदा आदिवासी संघटनेनी शासन व प्रशासनाला वस्तुस्थितीचे निवेदन दिले. वसतिगृह बांधकाम स्थळ व सद्यस्थितीत आयुष्य संपलेल्या भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या मुलींच्या वसतिगृहाला राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट देवून पाहणी केली होती. भाड्याच्या इमारतीत जीव मुठीत घेवून ७५ विद्यार्थीनी वास्तव्याला आहेत.भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या वसतिगृहाचा मुख्य कार्यालयाला कर न भरल्याप्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने सील ठोकले होते. यामुळे आदिवासी मुलींच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात आदिवासी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्र्यांना तहसीलदारांमधील निवेदन पाठविले. नवीन शैक्षणिक सत्रापासून शासनाने मुला-मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करावे अन्यथा २४ जून रोजी आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह नवीन इमारतीसमोर धरणे, उपोषण, रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.शिष्टमंडळात माजी भाजप आदिवासी आघाडीचे अध्यक्ष अशोक उईके, माजी पं.स. सदस्या प्रभा पेंदाम, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, आदिवासी विद्यार्थी संघ, तुमसरचे अध्यक्ष दिनेश मरस्कोल्हे, धनराज इळपाचे, विकास मरस्कोल्हे, नरेंद्र मडावी, हीना मडावी, निकिता सराटे, कैलास गजाम, सुभाष धुर्वे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)