शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा पुलावर तरुणीसह दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:27 IST

लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देट्रेलरची धडक : १४ फेब्रुवारीला होते तरुणीचे लग्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मंजूषा एकनाथ ठवकर (२२) रा. टेकेपार माडगी ता. भंडारा आणि हरीचंद तुळशीदास इनवते (३२) रा. खराडी ता. भंडारा अशी मृतांची नावे आहेत. हरीचंदच्या पत्नीची मैत्रीण मंजूषा ठवकर हिचे लग्न जुळले होते. पत्नीच्या माहेरी राहणारी आणि बालपणाची मैत्रीण असल्याने तिला मंगळवारी खराडी येथे पाहुणचारासाठी बोलाविण्यात आले होते. पाहुणचार आटोपल्यानंतर मंजुषाला गावी सोडण्यासाठी हरीचंद तिला घेऊन आपल्या दुचाकीने टेकेपारकडे निघाला होता. दुपारी २ वाजता भंडारा शहरातील वैनगंगा नदीचा पुला पार करत असतांना समोरुन आलेल्या ट्रेलरने (एम एच ३४ एएम ५९७१) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, हरिचंदचा जागीच मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मंजुषाला भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापुर्वीच तिचाही मृत्यू झाला.मंजुषा ठवकर ही पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. तिचे लग्न १४ फेब्रुवारीला पुणे येथेच आयोजित होते. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित असतांना ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी आली होती. मात्र काळाने बेसावधपणे डाव साधला आणि तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती घरच्यांना होताच आसमंत भेदून टाकणारा टाहो फोडला. तर हरीचंद हा नागपूरजवळचा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. चार वर्षापुर्वीच त्याचे टेकेपार येथील तरुणीशी लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगी, आई, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. खराडी येथे अपघाताचे वृत्त येऊन धडकताच प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतांना दिसत होता.अर्ध्यावरती डाव मोडला...मंजुषा ठवकर ही टेकेपारची तरुणी. पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. घरच्यांनी योग्य स्थळ शोधून तिचे लग्न जुळविले होते. १४ फेब्रुवारीला लग्न निश्चित झाले होते. या लग्नाची तयारी तिच्या घरी जोरात सुरु होती. पत्रिका वाटप करणे सुरु होते. अशातच ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात उध्वस्त झाले आणि अर्ध्यावरती डाव मोडला.