शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दोन शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:51 IST

संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देलाखनी येथील घटना : एकाला अटक-दुसरा शिक्षक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. परंतु भयभीत झाल्यामुळे या मुलीने कुठलिही वाच्यता केली नाही. दरम्यान, आज शनिवारला हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.याप्रकरणात लाखनी पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली असून दुसरा शिक्षक फरार आहे. लाखनी येथील आदर्श नगरातील दोन शिक्षकांनी दि.२ मे रोजी दुपारी १ वाजता शिक्षक थानसिंग बिसेन (४०) याने केसलवाडा (पवार) येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लाखनी येथे एमएससीआयटी या संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून स्वत:च्या दुचाकीने आणले.तिला आदर्श नगर येथील हिवराज कमाने (४२) या शिक्षकाच्या घरी घेऊन गेले. त्या ठिकाणी दोन्ही आरोपी शिक्षकांनी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी हिवराज कमानेला अटक केली असून या मुलीला दुचाकीवर आणणारा थानसिंग बिसेन हा शिक्षक फरार असून पोलीस त्याच्यावर मागावर आहेत.याप्रकरणी तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी भादंवि ३७६ (२) (फ) ३७६ (ड) सहकलम ४, १० लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ नुसार दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले हे करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कार