लाखोचे नुकसान : अज्ञात लोकांनी जाळले आरोपीचे दुकान पवनी : भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणासह महिलेवर धारदार शस्त्राने बापलेकाने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना काल शुक्रवारी पवनीत घडली. साईनाथ साठवणे यांचे शनिवारी वॉर्डातील घराचे काम सुरु आहे. घराजवळील देवा भशाखेत्री (५२) याने या कामावर आक्षेप घेऊन मजुरांना परत पाठविले. यावरून सायंकाळच्या सुमारास साईनाथच्या आईने त्याला हटकले असता बाचाबाची सुरू झाली. हा वाद वाढत गेला. दरम्यान या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या भारत ढवळे (५0) यांच्यावर देवा भशाखेत्री याने धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. भारतला वाचविण्यासाठी गेलेल्या मुक्ता व साईनाथला देवा भशाखेत्रीचा मुलगा योगेश (३0) ने काठीने वार केले. यावेळी काही लोक मदतीला धावून आले. घटनेची तक्रार पवनी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी भशाखेत्री पितापुत्रांना अटक करून जखमींना पवनी ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु जखमी भारत ढवळे व मुक्ता साठवणे यांची स्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपुरला हलविण्यात आले. या घटनेनंतर काल मध्यरात्री अज्ञात लोकांनी भशाखेत्री यांच्या जवाहरगेट परिसरातील चपल दुकानाला जाळले. या दुकानाची आग बावनकर व वाघमारे यांच्या दुकानालाही आग लागली. या तिन्ही दुकानाचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. (तालुका प्रतिनिधी)
बापलेकाच्या हल्ल्यात दोन गंभीर
By admin | Updated: May 24, 2014 23:21 IST