शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोन नगर पंचायतींचे शिलेदार आज ठरणार

By admin | Updated: November 30, 2015 00:45 IST

जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदूर व लाखनी या तीन नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाची निवड सोमवारला होऊ घातली आहे.

मोहाडीत अविरोध : लाखांदुरात हुमणेभंडारा : जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदूर व लाखनी या तीन नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाची निवड सोमवारला होऊ घातली आहे. या तिन्ही नगर पंचायतीमध्ये अनुक्रमे एक, दोन व तीन असे नामांकन दाखल करण्यात आले. मोहाडी नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदासाठी स्वाती निमजे यांचे एकमेव नामांकन दाखल झाल्यामुळे त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा तेवढी शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्यातील १७ सदस्यीय मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तीन नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. मोहाडी नगरपंचायतमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. मोहाडीत काँग्रेस १२, भाजप ०३, राष्ट्रवादी ०१, अपक्ष ०१ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत जे होते त्यांना आरक्षणाचा फटका बसल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. लाखनी येथे काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक आहे. लाखनीत काँग्रेस ०७, भाजप ०६, राष्ट्रवादी ०२, अपक्ष ०२ असे पक्षीय बलाबल आहे. याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा केली. येथे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता राखीव आहे. काँग्रेसतर्फे कल्पना भिवगडे, भाजपातर्फे ज्योती निखाडे यांनी तर लाखनी विकास मंच आघाडीतर्फे सुशीला भिवगडे यांनी नामांकन दाखल केले आहे. लाखांदूर येथे लाखांदूर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. १७ सदस्यीय लाखांदूर नगर पंचायतमध्ये भाजपा ११, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपद महिला प्रवर्गाकरीता राखीव आहे. नगराध्यक्षपदाकरिता भाजपाकडून नीलम हुमणे तर काँग्रेसकडून नीलिमा टेंभुर्णे यांना नामांकन दाखल केला. भाजपकडून नामांकन दाखल केलेल्या नीलम हुमणे हे अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. उद्या त्यांच्या विजयाची घोषणा तेवढी शिल्लक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)