शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वाघबोडीच्या शाळेला मिळणार दोन वर्गखोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:49 IST

भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव 'लोकमतने' उजेडात आणताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांचे आश्वासन : जीर्ण इमारतीचा प्रश्न सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव 'लोकमतने' उजेडात आणताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. दोन वर्गखोल्यांचे बांधकाम लवकरच करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे येत्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रशस्त इमारतीत शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.जिल्हा परिषद शाळा वाघबोडी येथील जीर्ण इमारतीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. येथे इयत्ता १ ते ४ पर्यंत शिक्षण घेतले जाते. येथे दोन शिक्षक असल्याचे दिसून आले. येथे वर्गखोल्यादेखील दोन आहेत. शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मुक्त मनाने जात असतात. परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक, पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते. प्रशासनाला मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र वाघबोडी येथील शाळेत पहावयाला मिळाले होते.शाळेचे स्लॅब खचलेले असून इमारतीतून तुकडे पडलेले आहेत. शाळेच्या इमारतीला भेगा पडल्या असून दोनही वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहेत. वाघमोडी येथे चार वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेशेजारी असलेल्या हनुमान मंदिरात ज्ञानार्जन दिले जात आहे. तिथे दोन वर्ग बसण्याची सोय केली आहे. स्वयंपाकाच्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर शाळेच्या वºहांड्यात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली जाते. या गंभीर बाबींमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक दडपणाखाली आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होवून विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहते काय, असा संतप्त सवाल पालकांनी केला होता.शाळेची दुरूस्ती करण्याची, नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची मागणी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मंगेश हुमणे, सामाजिक कार्यकर्ता जनार्धन निंबार्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर बडोले, उपाध्यक्ष विश्वनाथ वालदे, जाकीर शेख, गौतम तिरपुडे, अनिल शेख, जयेंद्र मरस्कोल्हे, राकेश कायते, विक्रम अंबादे, सारीका बडोले, प्रतिक्षा खोब्रागडे, आशिष बडोले यांनी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते यांनी वाघबोडी शाळेला भेट देऊन जीर्ण इमारतीची पाहणी केली. गावातील पदाधिकाऱ्यांशी व शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र रामटेके, सहाय्यक शिक्षिका रामटेके, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.