शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने दिला दोन पिलांना जन्म

By admin | Updated: August 4, 2016 00:29 IST

तालुक्यातील सावरला-नांदीखेडा वनक्षेत्रात एका मादी बिबटने दोन छाव्यांना जन्म दिला आहे.

सावरला वनक्षेत्रातील घटना : जयच्या शोधात लागला शोधपवनी : तालुक्यातील सावरला-नांदीखेडा वनक्षेत्रात एका मादी बिबटने दोन छाव्यांना जन्म दिला आहे. पवनी तालुका वाघाच्या अधिवासासाठी अनुकुल ठरत असल्याचे दिसून येत आहे. पवनी तालुक्यातील वाघ व बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाघांच्या अधिवासासाठी अत्यंत अनुकूल असलेले हे वनक्षेत्र वाघांच्या अधिवासामुळे पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. बिबट व तिच्या नवजात छाव्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केले आहे.पवनी तालुक्यातील वनक्षेत्र उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पात येते. मागील काही वर्षांपासून या अभयारण्यात वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा ‘जय’ नामक वाघ नागझिरा अभयारण्यातून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी परिसरातील जंगलात अधिवास निर्माण केले आहे. त्याच्या बेपत्ता होण्याच्या वार्तेनंतर वनविभाग खळबडून जागा झाला. त्याचा शोध घेत असतानाच सावरला वनक्षेत्रात एका बिबट मादीने दोन पिलांना जन्म दिल्याची घटना उघडकीस आली. प्रारंभी ही पिल्ले वाघाची असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु वनविभागाने ही पिले बिबटची असल्याचे सांगितले. या पिलाच्या सुरक्षेसाठी वनविभागाने पथक तैनात केले असून त्यांच्या निगराणी ठेवण्यात आलेली आहे.