शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवघ्या सात दिवसात तब्बल अडीच हजार पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

भंडारा : अवघ्या सात दिवसात तब्बल अडीच हजार कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची पाचावरण धारण बसली ...

भंडारा : अवघ्या सात दिवसात तब्बल अडीच हजार कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची पाचावरण धारण बसली आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत असून गुरुवारी तब्बल ७३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. कोरोना संसर्ग सुरू झाला तेव्हापासूनची ही सर्वाधिक आकडेवारी होय. जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ३७८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १४ हजार ८७१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले तर ३४४ जणांचा बळी गेला. सध्या ३,१६३ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दररोज स्फोट होत असून रोजची आकडेवारी विक्रमी येत आहे. गत सात दिवसात २ हजार ५१३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. केवळ ३० मार्चचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी २०० च्या वरच रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवार २६ मार्च रोजी २८५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २७ मार्चला २०० तर २८ मार्च रोजी रुग्णसंख्या दुप्पट होऊन ४३९ झाली. २९ मार्च रोजी हा आकडा २५७ वर पोहोचला. धूलिवंदनामुळे चाचण्या न झाल्याने त्या दिवशी केवळ ३३ पाॅझिटिव्ह आढळून आले. ३१ मार्च रोजी ५६६ रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी सर्वाधिक ७३३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचणीची संख्या वाढविल्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. गुरुवारी ६ हजार २४७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ७३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. त्यामध्ये भंडारा तालुक्यात ३२०, मोहाडी ६१, तुमसर १२७, पवनी ९४, लाखनी ८०, साकोली ३४, लाखांदूर १७ रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी १११ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत १४ हजार ८७१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. भंडारा तालुक्यातील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ३४४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या ३,१६३ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

बाॅक्स

४५ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरण

जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील १२८ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पहिल्या दिवशी कुठेही लसीचा तुटवडा जाणवला नाही. नागरिक या ठिकाणी लसीकरणासाठी येत असल्याचे दिसून येत होते. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडारा तालुक्यातील सिल्ली, मानेगाव बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

भंडारा तालुक्यात १,४४७ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात ३१६३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यातील सर्वाधिक १,४४७ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी २११, तुमसर ३८७, पवनी ५३८, लाखनी ३४२, साकोली १६४, लाखांदूर ७४ रुग्णांचा समावेश आहे.