शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

By admin | Updated: September 5, 2015 00:44 IST

मूलबाळ नाही, असे वारंवार टोचून बोलत असल्यामुळे दूरच्या एका नातेवाईकाने दुसऱ्याच्या मदतीने ६५ वर्षीय वृद्धेचा खून केला.

प्रकरण वृद्धेच्या खुनाचे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालभंडारा : मूलबाळ नाही, असे वारंवार टोचून बोलत असल्यामुळे दूरच्या एका नातेवाईकाने दुसऱ्याच्या मदतीने ६५ वर्षीय वृद्धेचा खून केला. त्यानंतर तिच्या साडेतीन वर्षाच्या नातवाचाही खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. शर्मा यांनी आज शुक्रवारला दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.अजय गिरीपुंजे (३२) आणि विनोद नवखरे (४२) रा.आंधळगाव अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे २ एप्रिल २०१४ रोजी लीलाबाई माणिकराव मानकर (६५) यांचा मुलगा सुभाष मानकर हे पत्नीसह मुलाला आईजवळ ठेऊन नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी गेले होते. त्याच रात्री त्या दोघांनी लिलाबाईचा गळा आवळून खून केला. त्यादरम्यान सुभाषला बाहेरगावी असतानाच आईचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तिथून परत येत नाही तोपर्यंत विनोद नवखरे याने लीलाबाईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती. यावर संशय आल्यामुळे सुभाष मानकर यांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. विनोद लीलाबाईचा दूरचा नातेवाईक असून त्याला ११ वर्षानंतरही मुलबाळ नव्हते. त्यामुळे लीलाबाई त्याला बोलत होत्या. त्यामुळे या वृद्धेचा वचपा काढण्याचा विचार विनोदच्या मनात घोळत होता. घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपींनी खून करण्याची योजना आखली. २ एप्रिलच्या रात्री घरात प्रवेश केला. त्यावेळी लिलाबाई नातवासोबत झोपून होत्या. झोपेतच या आरोपींनी तिचा गळा आवळून खून केला. आणि चोरी झाल्याचा देखावा करुन १.६० लाखांचे दागिने पळवून नेले.या प्रकरणात सरकारी पक्षाने १९ साक्षीदारांचे बयान घेतले. यावर अंतिम सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एैकल्यानंतर न्या. एस. के. शर्मा यांनी आरोपींना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. आय.ए. सिद्धीकी यांनी युक्तीवाद केला. (जिल्हा प्रतिनिधी)नातवाचे बयाण ठरले महत्त्वपूर्णलिलाबाईचा साडेतीन वर्षीय नातून खुश मानकर हा महत्त्वपूर्ण साक्षीदार ठरला आहे. लीलाबाईचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगून अंत्यसंस्कार करण्यासाठी सुभाष मानकरवर दबाव आणत होते. परंतु या घटनेत आरोपींनी गळा दाबलेल्या खुशने आजीचा मामाने गळा दाबल्याचे सांगितले. शिक्षेसाठी हे बयान महत्त्वपूर्ण ठरले.