शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

सूर्यकेतू नगरातील नाल्या तुंबूनच

By admin | Updated: June 4, 2014 23:31 IST

पावसाळा अगदी तोंडावर असताना, खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सूर्यकेतू नगरातील मुख्य व सब नाल्या ह्या सध्याच्या घडीला तुंबून भरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन

भंडारा :  पावसाळा अगदी तोंडावर असताना, खात रोडवरील खोकरला  ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सूर्यकेतू नगरातील मुख्य व सब नाल्या ह्या सध्याच्या घडीला तुंबून भरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन डासांचा प्रकोप मोठय़ा प्रमाणात झाला आहे. वॉर्डातील नागरिकांनी संबंधित वॉर्ड सदस्याला व ग्रामपंचायतला वेळोवेळी, कधी कधी तर  भ्रमणध्वनीवरुन वॉर्डात असलेली समस्या सांगण्यात आली. परंतु वॉर्डाचे असलेले वॉर्ड सदस्य व ग्रामपंचायतकडून सुद्धा त्याची तसदी न घेता असलेली समस्या आज जैसे थे असल्याने सुर्यकेतु नगरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. दुर्लक्ष होण्याचे कारण शोधले असता या ग्रामपंचायतमधील सचिव हे काही कारणास्तव लांब सुटीवर असल्याचे समजते. तसेच येथील महिला सरपंच  या वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करीत नसल्याचे समजले. याही पलीकडे  गेले तर कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतला कुलूप असल्याचे दिसून आले.सविस्तर असे की, पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या ह्या मोठय़ा प्रमाणात उद्भवत असतात. परिणाम म्हणून पावसाळ्यापूर्वी वॉर्डातील सांडपाणी व गटार वाहून नेणार्‍या नाल्या व सबनाल्यांची सफाई करण्यात येते.  परंतु खोकरला ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरुी आहे. याचे कारण म्हणजे ग्रामपंचायतमधील पदाधिकार्‍यांमध्ये असलेला असमन्वय. या ग्रामपंचायतमध्ये विकासाला गती न देता फक्त राजकारणालाच महत्व देत असल्याची ओरड वॉर्डवासीयांकडून केली जात आहे. त्याचे कारण म्हणजे जून महिन्यापासून पावसाचे नक्षत्र सुरू होत आहे. असे असले तरी मात्र अद्यापही अंतर्गत येत असलेल्या सुर्यकेतूनगर व इतर नव्या नगरातील वसाहतींमधील नाल्या ह्या घाणीने तुंबून आहे. वरील असलेल्या समस्येबाबत वेळोवेळी खोकरला ग्रामपंचायतला व वॉर्डातील संबंधित वॉर्ड सदस्याला नागरिक यांनी कळविले. परंतु त्यांचेकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बर्‍याचवेळा त्यांना कळविण्यासाठी खोकरला येथील नागरिक हे ग्रामपंचायतमध्ये गेले असता येथील सचिव काही कारणास्तव लांब सुटीवर असल्याने व महिला सरपंचाचे दुर्लक्ष होत असल्याने परिणामी कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतला कुलूप लागल्याची बाब समोर येऊन समस्याधारकांना  आल्यापावली परतावे लागते. विशेष म्हणजे काही कामे ही ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहेत. परंतु ते देखील थातूरमातूर पद्धतीने. त्यामुळे सूर्यकेतूनगरातील नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे. (नगर प्रतिनिधी)