शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे होणार स्थलांतरण

By admin | Updated: September 6, 2015 00:26 IST

शासनाने भंडारा येथील आदिवासी विकास प्रकल्प बंद करण्याचा निर्णय २ सप्टेंबर रोजी घेतला. पूर्वीसारखे हे कार्यालय देवरी येथे स्थानांतरण करण्यात येत आहे.

अन्याय : भंडारा-गोंदियाचे संयुक्त कार्यालय देवरीत होण्याच्या हालचालीतुमसर : शासनाने भंडारा येथील आदिवासी विकास प्रकल्प बंद करण्याचा निर्णय २ सप्टेंबर रोजी घेतला. पूर्वीसारखे हे कार्यालय देवरी येथे स्थानांतरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आदिवासींना पायपीट करावी लागणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भाजपच्या आदिवासी विकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवून स्थलांतरण न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागील पाच वर्षापूर्वी भंडारा मुख्यालयी आदिवासी प्रकल्प कार्यालय स्वतंत्रपणे सुरु करण्यात आले. पूर्वी भंडारा व गोंदियाचे संयुक्त कार्यालय गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे होते. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना सुमारे १५० ते १६० किमी लांब देवरी येथे शासकीय कामासाठी जावे लागत होते. अनेक योजनांपासून ते वंचित राहत होते. त्या अनुषंगाने, भंडारा जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र कार्यालय चार वर्षापुर्वी सुरु करण्यात आले.आदिवासी विकास विभागाचे एका पत्रान्वये भंडारा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धा येथे स्थलांतरीत करण्याची बाब विचाराधीन असून जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालय पूर्वीप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सन २००१ च्या जणगणनेनुसार आदिवासींची संख्या ९८ हजार होती. यात माना समाजाला २००३ मध्ये आदिवासीत समाविष्ट केले. सन २०११ मध्ये आदिवासींची जनगणनेत ८९ हजारसंख्या दर्शविली आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे भंडारा मुख्यालयापर्यंत अंतर ५० ते ६० किमी आहे. उलट देवरीला कार्यालय सलग्नीत केल्यास १५० ते १६० किमीच्या वर आहे. हे आर्थिक, मानसिक व शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरणार आहे. याकरिता हजारो आदिवासी बांधक रस्त्यावर उतरणार असून शासनाच्या निषेध करणार आहे. असा इशारा भाजपा आदिवासी आघाडी भंडारा जिल्हाध्यक्ष अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दामू धुर्वे, नरेंद्र मडावी, राजकुमार परतेती, मुकेश भलावी यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)