शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तालुक्यात १० हजार ५०० हेक्टरवर रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:04 IST

तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ५० टक्के रोवणी आटोपली आहेत. तालुक्यातील खरिप पिकाचे क्षेत्र एकूण २३ हजार १५९ हेक्टर आहे. तालुक्यात १२ आॅगस्टपर्यंत १० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी पुर्ण झालेली आहे. तालुक्यात १३ आॅगस्टपर्यंत ५७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात ५७७ मिमी पावसाची नोंद: विसावलेल्या पावसाची पुन्हा एकदा जोरदार हजेरी

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ५० टक्के रोवणी आटोपली आहेत. तालुक्यातील खरिप पिकाचे क्षेत्र एकूण २३ हजार १५९ हेक्टर आहे. तालुक्यात १२ आॅगस्टपर्यंत १० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी पुर्ण झालेली आहे. तालुक्यात १३ आॅगस्टपर्यंत ५७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यात लाखनी येथे ४१९१ हेक्टर, पिंपळगाव (सडक) ४४५१ हेक्टर, पोहरा ५३२९, मुरमाडी (तुपकर) ५६३३ हेक्टर जमिनीवर खरीप हंगामातील धानपिक लावलेले आहे. तालुक्यात एकुण २३ हजार १५९ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. तालुक्यात २१२६ हेक्टर जमीनीवर आवत्या टाकल्या आहेत. तालुक्यात भात पिकाखालील लाखनी ४०६५ हेक्टर, पिंपळगाव (सडक) ४२६२, पोहरा ५३००, मुरमाडी (तुपकर) ४१३१, पालांदूर चौ. ५३७४ अश्या एकुण २२ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रात धान रोवणी करण्यात येणार आहे.१३ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील लाखनी १९६६, पिंपळगाव (सडक) १८८० हेक्टर, पोहरा २३८९, मुरमाडी (तुपकर) १७५० हेक्टर, पालांदूर चौ. २५९० हेक्टर अश्या एकुण १० हजार ५७५ हेक्टर जमीनीवर रोवणी पुर्ण झाली आहे. तालुक्यात ३३२ हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी तूर लावगड केली आहे. यासोबतच तालुक्यात १३५४ हेक्टर जमिनीवर कडधान्याची लागवड केली आहे.तालुक्यात १४५० मिमी सरासरी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. १ जुन ते १२ आॅगस्टपर्यंत ५६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १३ आॅगस्ट रोजी १५.२७ मिमी पाऊस संपूर्ण तालुक्यात पडला आहे.गेल्या चार पाच दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. तालुक्यातील सिंचनाची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्याही रोवणीला सध्या वेग आला आहे.

टॅग्स :agricultureशेती