शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

धानाच्या उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण

By admin | Updated: June 22, 2014 23:54 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व आत्मा यंत्रणा भंडारा यांच्या सौजन्याने कृषी पर्यवेक्षक मोहाडी यांचेमार्फत करडी व मुंढरी सर्कलमधील १४ गावांमध्ये खरीप हंगामातील धानाचे

करडी (पालोरा) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व आत्मा यंत्रणा भंडारा यांच्या सौजन्याने कृषी पर्यवेक्षक मोहाडी यांचेमार्फत करडी व मुंढरी सर्कलमधील १४ गावांमध्ये खरीप हंगामातील धानाचे उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. श्री पद्धतीने भात लागवड कशी, करावी याची माहिती प्रोजेक्टरवर देण्यात आली. बिजप्रक्रिया, ऊस व केळी पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.खरीप हंगाम सन २०१४-१५ मध्ये भात पिकाचे उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने निलजबु, नरसिंगटोला, जांभोरा, केसलवाडा, डोंगरदेव, बोंडे, किसनपूर, दवडीपार, पांजरा बोरी, बोरगाव, निलजखुर्द, मुंढरीखुर्द, खडकी, ढिवरवाडा आदी १४ गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत श्री पद्धतीने धान पिकाची लागवड कशी करावी, बिजप्रक्रिया करताना काय काळजी घ्यावी, बिजप्रक्रिया कशी करावी याचे स्वत: प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. भात लागवडीचे शेतकऱ्यांना एलसीडी प्रोजेक्टरद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी पर्यवेक्षक तथा प्रभारी मंडळ अधिकारी एन.के. चांदेवार, आत्माचे ब्लॉक टेक्निकल तथा व्यवस्थापक बोरकर, करडी व मुंढरी सर्कलमधील कृषी सहायक विश्वनाथ उसावे, हुकरे, मेश्राम, रंगारी यांनी मार्गदर्शन केले. श्री पद्धत लागवडीमुळे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढीव उत्पादन घेता येते. उत्पादन खर्चही कमी येतो. पाण्याची ५० टक्के बचत होते. पिक १० दिवस अगोदर कापणीस येतो, एकरी २ किलो बियाणे लागते त्यामुळे बियाण्यावरील खर्चात कपात होऊन बचत होते, अशी माहिती दिली गेली, सध्याच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर श्री पद्धतीने धानाची लागवड करावी, जास्तीत जास्त नफा कमवावा, अशी कळकळीची विनंतीही यावेळी मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना केली. भात लागवडीकरीता गादी वाफयावर रोपे तयार करणे, प्रत्यक्ष शेतात रोपांची लागवड करणे, तण नियंत्रण उपाययोजना, खते व पाण्याचा सुयोग्य वापर तसेच किड व रोग नियंत्रण उपाय यावर तांत्रिक मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखविण्याची तयारी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. कृषी सहायकाचे पथक त्यासाठी तयार केले जात आहे. (वार्ताहर)