शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथे उच्च माध्यमिक इंग्रजी शिक्षकांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:52 IST

प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तज्ज्ञत्व औरंगाबाद) शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा, डाय सीपीडी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा अभियान उच्च माध्यमिक स्तर प्रशिक्षण गरजांचा अभ्यास वर्ग अकरावी व बारावीला इंग्रजी विषय शिकविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षण बैठक जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियान : प्रशिक्षणाला जिल्ह्यातील ८६ उच्च माध्यमिक शिक्षकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तज्ज्ञत्व औरंगाबाद) शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा, डाय सीपीडी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा अभियान उच्च माध्यमिक स्तर प्रशिक्षण गरजांचा अभ्यास वर्ग अकरावी व बारावीला इंग्रजी विषय शिकविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षण बैठक जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.ज्ञानेश्वर गौपाले (कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख जे.एम. पटेल कॉलेज भंडारा) होते. प्रमुख अतिथीमध्ये प्राध्यापिका सारिका, प्रा.अश्विनी पाटील, प्रा.नदीम खान (अ‍ॅकेडमी कमिटी मेंबर) प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रमोद इंगोले (न.प. ज्युनिअर कॉलेज पवनी) यांनी केले. तर डॉ.रवींद्र जनबंधू यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद तर्फे राबविल्या जाणाºया इंग्रजी विषयाला विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. प्रा.नदीम खान यांनी चेस अंतर्गत राबविण्यात येणाºया नवोदीत प्रकल्पाविषयी पीपीटीच्या सहाय्याने उपस्थित शिक्षकांना विस्तृत माहिती दिली.यावेळी प्रा.नदीम खान यांच्या कल्पकतेतून भंडारा जिल्ह्यातील इंग्रजी शिक्षकांचे चेसगृप तयार करण्यात आले. त्यामुळे इंग्रजी विषयाच्या बदलत्या अभ्यासक्रमाचे आकलन होऊन आदानप्रदान करणे सोपे जाईल.याप्रशिक्षण बैठकीला भंडारा जिल्ह्यातील ८६ उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.एस.आर. सावरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरे यांनी सहकार्य केले.