शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST

रेल्वेचे काम शिल्लक; सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार ०६लोक०२ के तुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे ...

रेल्वेचे काम शिल्लक; सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार

०६लोक०२ के

तुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार आहेत. त्यानंतर या उड्डाणपुलावरून नियमित वाहने धावतील. सध्या रेल्वेचे तांत्रिक काम शिल्लक आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या उड्डाणपुलावरून नियमित वाहतूक सुरू होणार आहे. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. कोरोनाकाळात उड्डाणपूल बांधकामाला फटका बसला होता.

मनसर-तुमसर-गोंदिया या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले. देव्हाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपूल बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होते. मागील दीड ते दोन वर्षात अरुणा संक्रमण काळात उड्डाणपूल बांधकामाला त्याचा फटका बसला. परंतु रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले.

सध्या रेल्वेचे काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. यात उड्डाणपुलाखालून रेल्वेच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू गेल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेकरिता उड्डाणपुलावर लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे. ही जाळी येण्याची प्रतीक्षा रेल्वे करीत आहे. जाळी बसविल्यानंतर रेल्वे प्रशासन वाहतुकीला हिरवी झेंडी देणार असल्याची माहिती आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे तसेच रेल्वे प्रशासनाचेसुद्धा उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात येत आहे.

वाहून जाणाऱ्या राखेमुळे प्रश्नचिन्ह

देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल हा दगडी असून, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला भरावात राख घालण्यात आली होती. बांधकाम सुरू असताना दगडातून राख मोठ्या प्रमाणात बाहेर निघाली. त्यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या पोच मार्गावर मोठे खड्डे पडले होते. ते खड्डे बुजवण्यात आले. पुलातून राख बाहेर का पडत आहे याकरिता सर्वांनी बांधकाम विभागाने तज्ज्ञांना पाचारण केले होते. येथे एक तज्ज्ञांचे पथक येऊन गेले; परंतु दुसर्‍या तज्ज्ञांचे पथक येथे अजूनपर्यंत आलेले नाही अशी माहिती आहे. पुलावरून वाहतूक सुरू करताना प्रथम काही दिवस वाहनाने ट्रायल म्हणून धावणार आहेत त्यानंतर नियमित वाहतूक उड्डाणपुलावरून सुरू होणार असल्याची माहिती आहे.

रेल्वेने केलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरक्षेकरिता लोखंडी जाळी बसविण्याचे काम तेवढे शिल्लक आहे. जाळी बसविल्यानंतर रेल्वेकडून वाहतुकीला परवानगी देण्यात येणार आहे.

- शिव दत्त, स्थापत्य अभियंता, रेल्वे