भंडारा
वाहतुकीची
शहरातील
वाहतूक
रस्त्यांवर
तासन्तास वाहने उभी ठेवलेली असतात. वाहतुकीचे मार्ग कसे सुरळीत करावे, याचे नियोजन मात्र वाहतूक शाखेकडे नाही. या नियोजनाची अंमलबजावणी करताना कुणीही दिसत नाही. (शहर प्रतिनिधी) नियंत्रण कक्षाचे कार्यालय मोठा बाजार परिसरात आहे. शहरात पार्किंंगची व्यवस्था नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा असतात. आवागमन करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. रस्ते अरुंद आहेत. रस्त्यांवर अतिक्रमण वाढलेले आहे. पार्किंंगची व्यवस्था नाही. शहराची लोकसंख्या दोन लाखाच्या घरात पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे बाहेरगावांहून येणार्यांची वर्दळ नेहमी असते. बुधवार आणि रविवारला आठवडी बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. या आठवडी बाजारात येताना दिव्य कसरत करावी लागते. बाजारात पायदळ पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो, दुचाकीने तासभर वेळ जातो. चारचाकीने तर पोहोचताच येत नाही. मोठा बाजार चौकात वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. भयावहता दिसत असतानाही शहर वाहतूक शाखेचा डोळेझाकपणा अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. : शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन कोलमडल्यामुळे वाहतुकीची कोंडी हा आता नेहमीचाच विषय झाला आहे. त्याचा फटका दररोजच शहरवासीयांना बसतो. या कोंडीविषयीचा संताप आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात येणार्या ग्राहकांना आणखी त्रस्त करतो. बाजार चक्क़ रस्त्यावर भरतो.