शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘ट्रॅफिक’ वाढतोय!

By admin | Updated: May 12, 2015 00:36 IST

जिल्ह्यातील मोजके रस्ते वगळल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन ...

वाहनांची संख्या वाढली : दुचाकी, चारचाकींची संख्या १७ हजारांवरदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यातील मोजके रस्ते वगळल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न, वाढते अपघात असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ १० टक्केही नाही. सन २०१४- १५ मध्ये जिल्ह्यात वाहनांची संख्या १६,९५२ आहे.भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ७५,४१४ असून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही वाढत आहे,, अशी ओरड केली जाते. मात्र गेल्या १० वर्षांत जिल्ह्याच्या लोकसंख्या कमालिने वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांतही मोठी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. सन २०१३-१४ मध्ये वाहनांची संख्या १६,३२१ होती. वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. सन २०१४ -१५ मध्ये जिल्ह्यात १४ हजार ९७२ दुचाकी खरेदी करण्यात आली. यासह इतर वाहने मिळून जिल्ह्यात एकुण वाहन १६,९५२ एवढी आहेत. सन २०१३-१४ मध्ये १४,४७८ दुचाकीसह एकूण १६,३२१ वाहने होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुचाकींच्या संख्येत ४९७ ने वाढ झाली आहे. दुचाकी विक्रीत वाढयुवकांना आकर्षित करुन वेगवान धावणाऱ्या दुचाकींची आवड लक्षात घेऊन विविध कंपण्यांनी आकर्षित अश्या दुचाकी बाजारात आणल्या. त्यामुळे महागाईचा विचार न करता ही वडील मंडळींकडे दुचाकी खरेदी करण्यासाठी हट्ट धरताना दिसून येतात. सन २०१३-१४ मध्ये १४ हजार ४७८ दुचाकींची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आली होती. तर सन २०१४-१५ मध्ये जिल्हयात एकूण १६ हजार ९५२ दुचाकीची नोंद करण्यात आली. तर सन २०१३-१४ मध्ये ९१० कार वाहन, तर सन २०१४-१५ मध्ये जिल्हयात एकूण ७१६ कारची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत १९४ कारची घट झाली आहे. शहरात वाहतूक सिग्नलची गरजभंडारा शहरात वाहतूकीची कोंडी नित्याचीच बाब ठरली आहे. शहरातील त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, लाल बहादूर शास्त्री चौक, नागपूर नाका, खामतलाव चौक या ठिकाणी वाहतूक सिग्नलची अति आवश्यकता आहे. वाहतूक विभाग, जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन वाहतूक सिग्नलविषयी अनेक वर्षांपासून तयारी दर्शवित असली तरी नियोजनाअभावी अद्यापही या दिव्यांविषयी जागरुक नाही. प्रायोगिक तत्वाचा अवलंब केल्यानंतर पुढची कारवाई थंडबस्त्यात आहे.