शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीत व्यापारी, ग्राहकांच्या हिताचे रक्षण

By admin | Updated: May 10, 2017 00:33 IST

केंद्र व राज्यातील १७ कर रद्द करुन एकच वस्तू व सेवाकर कायदा १ जुलै पासून देशभरात लागू होणार आहे.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : १ जुलै पासून लागू होणार, व्यापारी वर्गासाठी कायर्शाळालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र व राज्यातील १७ कर रद्द करुन एकच वस्तू व सेवाकर कायदा १ जुलै पासून देशभरात लागू होणार आहे. प्रस्तावित वस्तू व सेवाकर कायद्यात (जीएसटी) व्यापारी व ग्राहकांचे हित जोपासले जाणार आहे. हा कायदा सर्वसमावेशक असून या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर महागाई वाढणार नसल्याचे विक्रीकर उपायुक्त एस. व्ही. लहाने यांनी सांगितले. भंडारा व्यापार संघ व विक्रीकर कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलाराम सभागृहात कायर्शाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रवीण निनावे, विक्रीकर अधिकारी संदीप डहाके, गोपाल बावने, प्रशांत पोजगे, सुशांत नेरकर, राजेश राऊत, व्यापारी संघाचे रामविलासजी सारडा, दिनेशकुमार गर्ग, छगण संघानी, केशवराव निर्वाण, मोहन अग्रवाल, निखेत क्षिरसागर, मनोज संघानी, शाम खुराणा, संजय खत्री, डिम्पल मल्होत्रा, धिरज पटेल, मयुर बिसेन, चंद्रशेखर रोकडे व जॅकी रावलानी यावेळी उपस्थित होते.व्यापारी व ग्राहकांनी वस्तु व सेवाकर कायद्याबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही. जीएसटी मध्ये कर दराचे ०,५,१२,१८,२८ टक्के असे स्लॅब ठेवण्यात आले आहेत. सध्याच्या कर दराजवळ असणाऱ्या स्लॅबमध्येच त्या वस्तु आणि सेवांचे दर ठेवण्यात आले आहे. या स्लॅबमध्ये कुठल्या वस्तु आणि सेवा याबाबत १८ व १९ मे रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे लहाने यांनी सांगितले.जिवनावश्यक वस्तुंना जर राज्याच्या कर दरातून सुट असेल तर त्यांना जीएसटीमध्ये सुट राहणार आहे. शिवाय जीएसटीमध्ये करावर कराचा भार नसल्याने कराचा बोजा कमी होवून वस्तुंच्या किंमतीमध्ये कमी येईल व वस्तु स्वस्त होतील असेही ते म्हणाले. पेट्रोलियम पदार्थ आणि मद्य सध्या जीएसटी कार्यक्षेत्राबाहेर आहे. परंतु या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल मात्र जीएसटी अंतर्गत आहे. या नवीन कर कायद्यातील तरतुदी सहज व सोप्या असतील असे ते म्हणाले. व्यापाऱ्यांना पूर्वी सारखे अनेक ठिकाणी नोंदणी करण्याची आवश्यकता नसून जीएसटी अंतर्गत एकच नोंदणी करावी लागणार आहे. वस्तु ज्या राज्यात वापरल्या जाईल त्या राज्याला हा कर प्राप्त होईल असे सांगून लहाने म्हणाले की, ज्या व्यापाऱ्याचा वार्षिंक लेखाजोखा २० लाखाच्या आत असेल त्यांना नोंदणी करणे अनिवार्य नसेल. या कायद्याच्या अधिक माहितीसाठी व्यापारी व ग्राहकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी. जगातील सर्व जीएसटी कायद्याचा अभ्यास करुन आपला जीएसटी कायदा अधिक सुटसुटीत केला आहे, असे लहाने म्हणाले. जीएसटी कायद्याचे व्यापारी वर्ग स्वागत करीत असून हा कायदा खूप सरळ व उपयोगी असल्याचे रामविलासजी सारडा यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कायर्शाळेत व्यापारी वर्गाच्या सर्व शंका व प्रशनांचे उपायुक्त एस. व्ही. लहाने यांनी निरसन केले. या कायर्शाळेस व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. मनोरंजक पध्दतीने जीएसटी समजावून सांगण्यासाठी विक्रीकर विभागाच्या अधिकारी प्रियंका कोल्हे लिखीत पथनाटय सादर करण्यात आले.