शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसमारंभात नियमांना तिलांजली; १० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

भंडारा : कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नाही. तर दुसरीकडे नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत ...

भंडारा : कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नाही. तर दुसरीकडे नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा तालुक्यातील एका सभागृहात लग्नसमारंभात कोरोना नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येताच तहसीलदार व महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करीत आयोजकांवर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई शनिवारी ठाणा येथील बावनकुळे सभागृहात करण्यात आली.

ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दुसऱ्या लाटेत आढळून आले होते. विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठी होती. दरम्यान जिल्हा लेव्हल वनमध्ये आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अनेक बाबतींत नियम शिथिल केले होते. त्यातच याच काळात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसून येत नसल्याचे जाणवले. भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील खासगी सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. यात जवळजवळ १५० पेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित असल्याचे दिसून आले. याशिवाय कोविड - १९ अंतर्गत नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी संबंधित आयोजकांवर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच सदर प्रकार पुन्हा घडल्यास सभागृह सील करण्याची सूचनाही देण्यात आली.