शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

By admin | Updated: January 31, 2015 00:31 IST

सिरसाळा गावाजवळ वाघाने एका बैलावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. सिंदपूरी व कोदुर्ली गावाजवळील शेतशिवारात दिवसाढवळ्या बिबट्या दिसत असल्याने या बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे.

पवनी : सिरसाळा गावाजवळ वाघाने एका बैलावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. सिंदपूरी व कोदुर्ली गावाजवळील शेतशिवारात दिवसाढवळ्या बिबट्या दिसत असल्याने या बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. पाच किलोमिटर अंतरावरील सिरसाळा गावाच्या आजुबाजुने घनदाट जंगल आहे. त्यामुळे येथे नेहमी वन्यप्राण्यांचा संचार असतो. काल, गुरुवारी सकाळी एका बैलावर वाघाने हल्ला करुन त्याला ठार केले. या बैलाची किंमत जवळपास तिस ते चाळीस हजार रुपये आहे. वनविभाग चौकशी करीत आहे.पवनी-गोसीखुर्द रस्त्यावरील सिंदपुरी ते ईटगावच्यामध्ये असलेल्या शेताजवळ काही दिवसापासून एक मादी बिबट मुक्कामाला आहे. या परिसरात ही मादी बिबट दोन पिल्यांसोबत फिरताना अनेकांनी पाहिले. शेतामध्ये असलेल्या उसात व जवळच असणाऱ्या नाल्याजवळ हे बिबट्याचे कुटूंब सध्या वास्तव्य आहे. हा रस्ता रात्री उशिरापर्यंत नेहमी वर्दळीचा राहत असल्यामुळे या बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे अंधार पडण्यापुर्वीच शेतकरी आपल्या घरी परततात.कोदुर्ली गावाजवळ वैनगंगा नदीच्या जवळील शेतामध्ये एक बिबट नेहमी वास्तव्यास असतो. हा बिबट काल दिवसा दुपारी गावातील महिलांना दृष्टीस पडला हा बिबट रात्रीच्या वेळेस अनेक वेळा गावात ही आला आहे. या बिबट्याने नदीपलीकडे जुनोना गावात जावून बछड्याला दोन दिवसापुर्वी ठार केले. या बिबट्याने या भागात चांगलीच दहशत निर्माण केल्याने सर्व लोक अंधार पडण्यापुर्वी आपल्या घरी परततात. (शहर प्रतिनिधी)