नाहक त्रास : आरक्षण सुविधा साकोलीतून देण्याची मागणीसाकोली : भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील साकोली येथून १० कि.मी. अंतरावर गोंदिया जिल्हा लागतो. सदर अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात आहे. त्याचे क्षेत्रीय कार्यालय भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आहे. आरक्षण गोंदिया व नागपूर येथून होते. मात्र मुंबई, पुणे, नागपूरवरून येणाऱ्या पर्यटकांना साकोलीमार्गे जावे लागते. त्यामुळे आरक्षणाची सोय साकोली येथे करण्यात यावी, अशी पर्यटकांची मागणी आहे.साकोली कार्यालय राष्ट्रीय महामार्गावर आहे. महाराष्ट्र ते मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग. या महामार्गावरून म्हणजे साकोली कार्यालयापासून २ कि.मी. अंतरावर आहे. सर्वाधिक सोयीस्कर असे हे कार्यालय आरक्षणासाठी योग्य आहे. मात्र हे अभयारण्य या कार्यालयापासून जवळ असूनही आरक्षण करण्याचा कोणताही अधिकार या कार्यालयाला नाही. त्यामुळे पर्यटकांना आरक्षण नागपूर अथवा गोंदिया येथील कार्यालयातून करावे लागते.साकोली येथून नागपुरचे अंतर १०० कि.मी. तर गोंदियाचे अंतर ६० कि.मी. आहे. तसे पाहता साकोली केंद्रस्थानी आहे. परंतु अद्यापही या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सन १९६८-६९ मध्ये हे अभयारण्य भंडारा जिल्ह्याचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. यात पिटेझरी, कोसमतोंडी, मुरपार, मुरदोली, मंगेझरी, आलेझरी, चोरखमारा हे गाव अथवा राहण्याचे रस्ते आहेत. मात्र पाच वर्षापूर्वी या अभयारण्याचे रुपांतर आता व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले. जिल्हा विभागणीनंतर सदर प्रकल्प हे गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला गेले. साकोली येथे नागझिरा वन्यजीव कार्यालय असूनही पर्यटकांच्या बाबतीत शून्य ठरते. (तालुका प्रतिनिधी)
तीन जिल्ह्यातून व्याघ्र प्रकल्पाचा कारभार
By admin | Updated: December 15, 2015 00:47 IST