शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

बाघ पाटबंधारे विभागाचा दुर्लक्षितपणा

By admin | Updated: April 6, 2015 00:49 IST

बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग आमगाव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे.

दुर्लक्ष : ४५ वर्षांपूर्वीच्या माल्ही, शंभुटोला वितरिकेची दुर्दशाआमगाव : बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग आमगाव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे. याकरिता गावातील परिसरांना लागून वितरिका तयार केली मात्र ४५ वर्षापूर्वी तयार झालेल्या अनेक वितरिका आपली शेवटची घटका मोजत आहेत. यात माल्ही, शंभुटोला परिसरातील बाघपाटबंधारे विभागाची वितरिका विभागाच्या दुर्लक्षितपणाची शिकार ठरली आहे. या वितरिकेच्या दुर्गतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात खरीप व रब्बी पाणी जात नाही, अश्ी बाघ पाटबंधारे विभागाची गंभीर अवस्था आहे. तीन धरणाचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतो. त्यात शेतकरी डिमांड भरुन लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करतात. अनेक कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांना पाणी मिळण्याकरिता व व्यवस्थापनेसाठी कार्यरत आहेत. फक्त कार्यालयात खुर्च्या मोडने हा वेळापत्रक शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता व इतर कर्मचाऱ्यांचा आहे. मात्र चाळीस वर्षापूर्वी तयार झालेली माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेची दुर्गती बघितल्यानंतर शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. १९६९, ७० व ७१ या तीन वर्षात आमगाव, माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेचे काम करण्यात आले. हा तिन्ही गावाचा शेती परिसर जवळपास दोन हजार तिनश्े एकराचा आहे. त्यात वितरिकेचे पाणी दोन हजार शंभर एकरात रबी व खरीप पिकाकरिता पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला पुरविला जातो व दोनशे एकर शेती कोरडवाहू आहे. प्रयत्न केला तर या शेतीला पाणी जाऊ शकतो, अशी पतिक्रिया पाणी बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या दोनशे एकरात उत्पन्न घेणारे शेतकरी अधिकारी यांना वजन देऊन आपले उत्पन्न घेतात. मात्र या वितरिकेवर पंधरा वर्षापूर्वी काम झाले पण ते थातूरमातूर करण्यात आले. उपसा केला जातो मात्र शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रकारे शेतीला पाणी मिळत नाही. लाखो रुपये पाणीपट्टी कराचे वसुल करुन शेतकऱ्यांना पाणी नाही. वितरिकेची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट काम नासधुस झाले आहेत. केव्हाही वितरिका ओलांडतानी धोका होऊ शकतो. मात्र अधिकारी वितरिकेच्या कामासाठी पूर्णपणे उदासीन आहेत किंवा त्याचे लक्ष नाही. आज वितरिकेत पाणी नाही. मागीलवर्षी या परिसरात रबी लावली होती. पण तेथे पाण्याचा हाहाकार झाला हे विशेष. म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्याकरिता कवायत करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा विचार करावारोटेशननुसार यावर्षी वितरिकेला रबी पाणी नाही, मात्र पाण्याची भिषणता लक्षात घेता आठवड्यातून एकदा तरी पाणी देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी माल्ही वितरिकेला पाणी जाऊ नये यासाठी वितरिकेत सिमेंट बांधकाम केल्याने एक थेंब पाणी येत नाही. एकंदरित आमगाव, माल्ही, शंभुटोलाला महारीटोला वितरिकेचे काम होणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे फटका शेतकऱ्यांना बसत आहे.