शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

व्याघ्रदिन कार्यक्रम

By admin | Updated: August 1, 2016 00:18 IST

कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कार्यक्रम पार पडला.

मुखवटा स्पर्धा : अनेक विद्यार्थी बनले वाघसाकोली : कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कार्यक्रम पार पडला.संस्था सचिव विद्या कटकवार, प्राचार्य प्रकाश मस्के, प्रा.यु.टी. गायधने यांचे उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने, निसर्गमित्र शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम व गुणवंत जिभकाटे यांनी व्याघ्र दिनानिमित्त सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी व्याघ्र दिनानिमित्त वाघ चेहरा रंगवा, वाघ मुखवटा बनवा, वाघ संदेश लिहा स्पर्धा विद्यालयात घेण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षण पुष्पा बोरकर, मनिषा कशीकर, प्रा.के.पी. बिसेन, शुभम बघेल, गुणवंत जिभकाटे तसेच बाळकृष्ण मेश्राम यांनी केले.वाघ चेहरा रंगवा स्पर्धेत मिडलस्कुल गटात रितीक शौरी, आयुष खोब्रागडे यांना प्रथम तर आर्यन टेंभुर्णे, जयंत मेश्राम, प्रणाली लांडेकर, भावना तिलकराज यांना द्वितीय व यामीनी भेंडारकर, लिना शिवनकर यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक हिमांशू कटरे, यश क्षीरसागर, दिनेश कुरंजेकर, सुरेश कापगते, भाग्यश्री कांबळे, तृप्तीका कठाणे यांना प्राप्त झाला. हायस्कुल गटात दिपांशु पोकळे, युवराज बोबडे, शानिद पठाण, अनिकेत नागोसे यांना प्रथम क्रमांक तर निहांस थानथराटे, सिद्धांत दुबे, महेश गिऱ्हेपुंजे, चैतन्य कटरे यांना द्वितीय क्रमांक तर परिचित खोटेले, प्रतिक कापगते, मिहीर कान्हेकर, ओम बैस, सजल रोकडे, सुमित तिडके यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक क्रिश गहाणे, हर्षद गहाणे, सुभाष शहीर, शौशित परमार यांना प्राप्त झाला. ज्युनिअर कॉलेज गटात मोहिनी खडसिंगे, पुनम चांदेवार हिला प्रथम तर प्रणाली लांडेकर ला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. वाघ मुखवटा बनवा स्पर्धेत इंग्लीश स्कुल गटात चैतन्य रहांगडालेला प्रथम तर सेजल भेंडारकरला द्वितीय, शहजाद शेख व शिवानी चौधरीला तृतीय क्रमांक प याप्त झाला. मिडलस्कुल गटात प्रदीप क्षीरसागरला प्रथम तर दिव्यास गजापुरे, पियुष पोटेफोडे व रितीक शौरी ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. हायस्कुल गटात सजल रोकडेला प्रथम तर सम्यक साखरेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. प्रफुल साखरे, कुणाल आरसोडे, युवराज बोबडे, भाग्यश्री कांबळे, कृतीका कठाणे, सतीश नकरे, मोम्मटु कोते, जय रहांगडाले, हर्षा लांडेकर, चैतन्य कटरे, शुभम शहारे, समीर भेंडारकर यांना प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला.वाघ चित्र संदेश बनवा स्पर्धेत चैतन्य रहांगडाले प्रथम, शिवानी चौधरीला द्वितीय क्रमांक, ज्युनिअर गटात प्रणाली लांडेकरला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. अश्विन कुंभरेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. हायस्कुल गटात नेहा बडोले ला प्रथम तर काजल वाघमारेला द्वितीय क्रमांक व अस्मिता रामटेके ला तृतीय क्रमांक व दिपांशू पोवळेला प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला. संचालन व आभार बी.एस. लंजे, प्रा.शीतल शाहू यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)