शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे तीनतेरा

By admin | Updated: April 15, 2017 00:26 IST

दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहेत.

नाल्यांमध्ये तुंबला कचरा : कचरा कंटेनर ओव्हरफ्लोइंद्रपाल कटकवार भंडारादीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहेत. नगरपालिका मध्ये सत्तापरिवर्तन होऊन चार महिन्यांचा कालावधी होत असला तरी शहराचे रंगरूप बदलेल अशी आशा होती. मात्र जिकडे तिकडे पसरलेला कचरा, दूषित पाणी पुरवठा, पार्किंगची अव्यवस्था, आठवडी बाजारातील दुरवस्था आदी समस्या अजूनही जैसे थे आहेत. तांदळाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी जशा सुविधा शहरवासीयांना अपेक्षित आहेत, तशा उपलब्ध नाहीत. दीड लक्ष लोकसंख् या असलेल्या भंडारा शहरात कुठेही महिलांसाठी शौचालय तथा मुत्रीघराची व्यवस्था नाही. उद्याने, अरुंद रस्ते व दूषित पाणी पुरवठा तसेच अतिक्रमणाचा फटका ही मुख्य बाबी शहराच्या विकासाला गालबोट लावत आहेत. विकासाचे राजकारण चालत असले तरी गल्लीबोळीतील अस्वच्छता मुख्य रस्त्यावर चर्चेचा विषठ ठरलेला आहे. ऐन बाजाराच्या दिवशी स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसून येतो. शहराची व्याप्ती लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाकडे पुरेशी यंत्रणा आहे किंवा नाही ही बाब त्या विभागालाच ठाऊक असावी. ठिकठिकाणी कचरा कंटेनरची व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिकांची मानसिकता कचरा कंटेनर ऐवजी बाहेर फेकण्याचीच जास्त आहे. यासाठी पालिका प्रशासनाचे कर्मचारीही हतबल आहेत. लक्षावधी रुपये खर्चून दाभा येथे घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संयत्र उभारण्यात आला होता. आजघडीला तो संयत्र धुळखात आहे. लक्षावधी रुपयांची उलाढाल घनकचरा व्यवस्थेपोटी होत असली तरी शहराचे सौंदर्यीकरण खरच कुठेतरी हरपले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व नागरिकांची मानसिकता ही दोन प्रमुख कारणे यासाठी कारणीभूत ठरताहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.