शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर तीन अस्वलांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

गोंदिया : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर तीन अस्वलांनी हल्ला करून त्याला जखमी केले. जवळील ग्राम खैरी बोरटेकरी रामघाट जंगलात ...

गोंदिया : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर तीन अस्वलांनी हल्ला करून त्याला जखमी केले. जवळील ग्राम खैरी बोरटेकरी रामघाट जंगलात रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. शैलेश भैयालाल रामटेके (३२, रा. बोळदे) असे जखमी मजुराचे नाव आहे.

शैलेश रामटेके यांच्यासह गावातील चार महिला व अन्य एक पुरुष वन विभाग खैरी बोरटेकरी रामघाट जंगल परिसरात पहाटेच्या सुमारास तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेले होते. हा परिसर मोठ्या प्रमाणात झुडपी असल्याने त्यांना अस्वल दिसले नाही. मात्र तेथे अस्वल आपल्या पिलांसोबत बसले होते व आपल्या पिलांच्या संरक्षणाच्या उद्देशातून त्यांनी हल्ला केल्याचे समजते. यात शैलेशच्या डाव्या खांद्यावर अस्वलाने हल्ला करून जखम केली आहे. जीव वाचविण्याच्या नादात शैलेश पळाला असता त्याची झाडाला धडक झाली आणि पडल्याने डाव्या पायाला पण गंभीर मार लागला आहे. घटनास्थळी असलेले इतर लोक ओरडल्यामुळे अस्वल तिथून पळून गेले. त्यानंतर शैलेशला लगेच ७ वाजण्याच्या दरम्यान अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याची परिस्थिती बरी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्जुनी - मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही. तसेच या भागाच्या बीटरक्षक यांना सूचना देऊनही त्यांनी सायंकाळपर्यंत पंचनामा करतो, असे सांगितले. तसेच जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनीही फोन स्वीकारला नाही. जखमी मजूर सुशिक्षित बेरोजगार असून हाताला काम नसल्याने तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहे. घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असून वन विभागाने पाच लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी शैलेश, त्याचे वडील भैयालाल व कुटुंबीयांनी केली आहे.

मी स्वतः डिसीएफ कुलराज सिंग यांना फोन केला, तर त्यांनी फोन स्वीकारला नाही. वन विभाग वाऱ्यावरच असल्यासारखा आहे. जखमी मजुराला शासनाची मदत तातडीने मिळावी, असा प्रयत्न सुरू आहे.

- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार अर्जुनी-मोरगाव विधानसभा.