शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांना मिळाला महसुली गावाचा दर्जा

By admin | Updated: January 12, 2016 00:34 IST

प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करून ज्या गावात वास्तव्य करण्यात येत असते,...

भंडारा, पवनी तालुक्याचा समावेश : मागीलवर्षी १६ गावांचा समावेशभंडारा : प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करून ज्या गावात वास्तव्य करण्यात येत असते, त्या गावांना शासनाच्या राजपत्राप्रमाणे जिल्हाप्रशासन महसुल गाव म्हणून घोषित करते. चालु वित्तीय वर्षात जिल्हा प्रशासनाने पवनी येथील चिचखेडा (पुनर्वसन) तथा भंडारा तालुक्यातील मौदी (पुनर्वसन) या दोन गावांना महसुल गावाचा दर्जा प्रदान केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी १६ गावांना महसुली गावांचा दर्जा देण्यात आला होता. विदर्भातील महत्वाकांक्षी तथा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळालेल्या गोसीखुर्द धरणांतर्गत प्रकल्पबाधितांना पुनर्वसनाअंतर्गत नियोजित स्थळी स्थायी करण्याचे उदिष्ठ टप्प्यानुसार होत आहे. या अंतर्गत पवनी तालुक्यातील चिचखेडा या गावाचे पुनर्वसन कोसमतोंडी गावसिमेत करण्यात आले आहे. या गावाला आला चिखेडा पुनर्वसन म्हणून ओळखण्यात येणार आहे. त्याचप्रकारे भंडारा तालुक्यातील मौदी या गावाचे पुनर्वसन पहेला गावसिमेत करण्यात आले आहे. या गावाची ओळख आता मौदी पुनर्वसन म्हणून ओळखण्यात येणार आहे. महसुल गावाचा दर्जा मिळाल्यामुळे अन्य गावांना मिळणाऱ्या नागरी सुविधा या गावातील नागरिकांना मिळणार असल्याचे राजपत्रात नमुद केले आहे. (प्रतिनिधी)चिचखेडा आणि मौदी या दोन्ही गावांच्या महसूल दर्जाबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी मंजुरी प्रदान केली आहे. त्या दिशेने महसुल यंत्रणेचे काम सुरू आहे. प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील.- सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा.