युवराज गोमासे करडी (पालोरा)विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच बचतीचे धडे मिळावेत, ती बचत उन्नत कार्यासाठी कशी व केव्हा वापरावी याचेही नियोजन करता यावे, या उद्देशानेच पालोरा जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाने चिल्ड्रन मनी बँकच्या उपक्रम हाती घेतला. केवळ विद्यार्थ्यांसाठी असलेला उपक्रम आज शालेय कर्मचाऱ्यांना उपयोगी पडत असून १००० रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज त्यांना शाळेतूनच मिळत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पालोरा येथे १ जानेवारी २०१५ रोजी चिल्ड्रन मनी बॅकच्या सुरुवात केली गेली. १ रुपयांपासून २० रुपयांपर्यंतची बचत या माध्यमातून होत आहे. बचत खाते इलाहाबाद बँकेत शिक्षक तथा योजनेचे मार्गदर्शक संजय वासनिक यांचे नावे उघडत आहे. गरजेनुसार कधीही व केव्हाही पैसे काढता व भरता येत असल्याने वेळेची गरज त्वरित भागविली जाते. उपक्रमात वर्ग ५ ते १२ वी पर्यंतच्या ७० विद्यार्थ्यांचे खाते असून दररोज २०० रुपयांची बचत होत आहे. आतापर्यंत ३००० हजार रुपये योजनेत जमा झाली आहेत. विद्यार्थी शाळेबाहेर जाऊ न खाऊ खातात व पैसाचा अपण्यय होतो. विद्यार्थीची प्रकृती बिघडते. शिवाय ते पैसे विधायक कामासाठी, गरजेच्यावेळी उपयोगी पडत नाही. शालेय उपक्रम उदा. सहल, शालेय फि, साहित्य खरेदी आदी व अन्य कामासाठी पैसाचा सदुपयोग व्हावा, विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने उपक्रम राबविला जात असल्याची माहिती शाळेचे व महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर नागरिकर यांनी दिली. विद्यार्थ्यांजवळील पैसाचा दुरुपयोग थांबल्याने पालकांनी सुद्धा यास पसंती दर्शविली आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना कर्ज स्वरुपात १००० रुपयांपर्यंतची रक्कम त्वरित दिली जात असून कर्जही बिनव्याजी आहे. उपक्रमातील पैसाचा हिशेब व दस्तऐवज अभिषेक कनोजकर हा विद्यार्थी सांभाळत असून पैसाची वसुली प्राजक्ता चिमणे, अमर भोयर करतात. यासाठी शिक्षक संजय वासनिक यांचे मार्गदर्शन लाभत असते. शाळा समिति अध्यक्ष बाबुजी ठवकर यांचे विविध उपक्रम व सोयी - सुविधांसाठी मार्गदर्शन व मदत ठरली आहे.किशोरी उत्कर्ष मंच -किशोरवयीन मुली आपल्या समस्या कुणाकडेही सांगण्यास घाबरतात. त्यांचा शारिरिक, भावनिक व मानसिक त्राण, तणाव समजून घेता यावा, त्यावर स्वतंत्र्यरित्या उपाय योजना करता यावी यासाठी किशोरी उत्कर्ष मंच तक्रारपेटी शाळेत लावण्यात आली आहे.आम आदमी विमा शिष्यवृत्ती- गरिबाचा एकही मुलगा त्याच्या अधिकारापासून, हक्कापासून वंचीत राहू नये हे ध्येय मनी बाळगून शाळेने स्वतंत्ररित्या आम आदमी विमा शिष्यवृत्ती योजनेसाठी दालन उघडले आहे.मिना राजू मंच - मुलामुलींना समानतेचा दर्जा देण्यासोबत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मिना राजू मंचाची स्थापना करण्यात आली.
‘त्या’ शाळेत मिळते हजार रुपयांपर्यंत ‘बिनव्याजी कर्ज’
By admin | Updated: February 26, 2015 00:28 IST