शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १८ जिगरबाजांचे सहा तास शर्थीचे प्रयत्न

By admin | Updated: August 16, 2014 23:17 IST

चार दिवसांपूर्वी वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन नदीपात्रात कोसळलेली कार शोधण्यासाठी अनेक निष्णात आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर

नंदू परसावार - भंडाराचार दिवसांपूर्वी वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन नदीपात्रात कोसळलेली कार शोधण्यासाठी अनेक निष्णात आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर खमारी येथील १८ जिगरबाज तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत नदीपात्रातील रेतीत घट्ट फसून असलेली कार शोधून काढली.मंगळवार दि.१२ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास भरधाव कार पुलावरुन नदीत कोसळली. त्यानंतर बेपत्ता कारचे शोधकार्य सुरू होते. प्रारंभी पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन कार शोधली परंतु त्यांना सापडली नाही. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नागपूर महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांना बोलावून कारचा शोध घेतला. परंतु, त्यांनाही कार आढळून आली नाही. त्यानंतर शुक्रवारला खमारी येथील मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सदस्यांना बेपत्ता कार शोधण्यासाठी सांगण्यात आले. सकाळी १२ वाजतापासून या जिगरबाज तरुणांनी संस्थेच्या मालकीचे लाकडी डोंगे आणून शोधकार्य सुरू केले. दरम्यान, दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शेखर वानाजी चांदेकर या ३० वर्षीय तरुणाच्या हाताला कारचा स्पर्श झाला. कारच आहे कां? याची चाचपणी करण्यासाठी त्याने आणखी एकदा खोल पाण्यात शिरला असता कारच्या समोरचे काच फुटून मृतकाचा एक पाय बाहेर असल्याचे त्याला दिसले. कार आणि कारमध्ये मृतक असल्याची खात्री पटताच त्याने ही माहिती सहकाऱ्यांना दिली. त्याच्या पाठोपाठ कुसन मेश्राम, प्रकाश चांदेकर, युवराज मेश्राम, धनराज मेश्राम, गोपीचंद केवट, इस्तारी मेश्राम, दिलीप मेश्राम, बबन मेश्राम, रामू मेश्राम, उमराव मेश्राम, कैलास चांदेकर, प्रभाकर मेश्राम, हरीश्चंद्र मेश्राम, स्वप्नील मेश्राम, जितेंद्र शेंडे, राकेश केवट, शैलेश भुरे, सुरेश चंदनबटवे आणि शेरु भुरे यांनी पाण्यात कार असल्याचे बघितले. २५ ते ३० फूट खोल पाण्यात फसलेल्या या कारची तीन चाके रेतीत फसून होती तर एक चाक वर दिसत होते.समोरच्या काचातून मृतकाचा डावा पाय काच फोडून बाहेर होता, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानंतर कारला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु कार रेतील इतकी घट्ट फसून होती की, कारला बाहेर काढण्यासाठी हुक कुठे अडकवायचा त्यासाठी जागा मिळत नव्हती. दोरखंडाने बांधून काढण्याचा प्रयत्न केला असता दोरखंड तुटला. अखेर लोखंडी साखळीच्या सहाय्याने कारला हुक अडकविण्यात आला. हा हुक तीनदा निसटला. हुक अडकताच क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यासाठी नागपूर केंद्रीय आपत्ती नियंत्रण पथकाने पुढाकार घेतला. तरीसुद्धा कार शोधणे आणि बाहेर काढणे यासाठी सहा तासांपेक्षा अधिक तास या जिगरबाज तरुणांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी कारमधून मृतदेह बाहेर काढला. आज या तरुणांची भेट घेतली असता ते म्हणाले, कारच्या समोरील भागाच्या डाव्या बाजुचा टायर फुटला होता. पुलावरच टायर फुटल्यामुळे कार नदीत कोसळली असावी, असे या मदत कार्यातील सुरेश चंदनबटवे व तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.