शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशी उघडले बोदरा ग्रामपंचायतीचे कुलूप

By admin | Updated: January 28, 2015 23:09 IST

बोदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला २६ ला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. प्रकरण चिघळले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी ग्रामवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडले. या प्रकरणाची तक्रार

साकोली : बोदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला २६ ला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. प्रकरण चिघळले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी ग्रामवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडले. या प्रकरणाची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे सरपंचासह कमेटीने ही तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली आहे.सरपंच शांता पुरामकर यांच्या तक्रारीनुसार, प्रकाश पुरामकर, जयेश कापगते, रवी घरडे, महेश राऊत, परमानंद गणवीर, भागवत कापगते, शांताराम शेंडे, अशोक तिरपुडे, सुरेश तिरपुडे, गजानन परशुरामकर, जास्वंद कापगते, नामदेव कोसरे सर्व रा.बोदरा यांनी ग्रामपंचायत कार्यालय बोदरा येथील कार्यालयात ग्रामसभा सुरु असताना ग्रामसभेत धिंगाणा घालून सरपंचांची मानहानी केली. दि. २६ जानेवारीला साडेबारा वाजेदरम्यान ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सचिव गैरहजर असल्यामुळे सभेचे आयोजन सरपंच यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेला उपसरपंच नंदेश्वर मेश्राम, सदस्य अश्वघरा ईलमकार, सारिका मेश्राम, इंदू पुरामकर, बाळा सोळी, शांताराम शेंडे, धम्मदीप तागडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसभेमध्ये ठेवलेल्या विषयावर साधक बाधक चर्चा करून संबंधित विषयाचा निपटारा करण्यात आला. सभा संपताना जयेश कापगते, शांताराम शेंडे, भागवत कापगते, सुरेश तिरपुडे, अशोक तिरपुडे यांनी मागणी बिलासंबंधात मुद्दा उपस्थित करून उत्तर देण्यासाठी सांगितले. तेव्हा सचिव गैरहजर असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. सचिव आल्यावर या प्रश्नाचे उत्तर देतील असे सांगितले. तेव्हा सर्व गैरअर्जदारांनी धिंगाणा करणे सुरु केले. तेव्हा मी सभा संपल्याचे घोषित केले. यावेळी प्रकाश पुरामकर याने उपसरपंच मेश्राम यांना शिवीगाळ केली व जयेश कापगते व शांताराम शेंडे यांनी सरपंच यांनाही शिवीगाळ करून ग्रामसभेत अपमानीत केले. सर्व गैरअर्जदारांनी एकमेकांशी संगनमत करून द्वेशभावनेने सरपंच व उपसरपंच यांना अपमानीत केले. यानंतर गैरअर्जदारांनी ग्रामपंचायतला जबरान कुलूप ठोकले. त्यामुळे दोषीवर कारवाई करावी अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)