शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून बहिणीशी झाला वाद, भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 25, 2023 13:34 IST

चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला.

भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत पोहचले, अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. सदर घटना भंडारा तालुक्यातील वरठी लगतच्या सोनूली येथे घडली. वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे (२०) असे मृत बहिणीचे नाव आहे. भंडारा तालुक्यातील वरठी नजीकच्या सोनूली या गावात रविवारी घडलेली ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. 

सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हान ला कार्यक्रमानिमित्त गेले होते. दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघे घरी होते.

दुपारी दोघात प्रेमप्रकरणावरून शाब्दिक वाद झाला. क्षुल्लक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाका-तोंडावर बुक्क्या हणल्या. एवढ्यावरच न थांबता तिचा गळा आवळला. यात नकळत ती गतप्राण झाली. घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावातही शुकशुकाट होता.दरम्यान, पोलीस पाटीलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. तो पर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळ्यावर दाबल्यागत खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.

परिक्षेकरिता आली होती स्वगावी

अश्विनी नागपूरला मावशीकडे राहायची. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती नागपूरला व्यावसायिक शिक्षण घेत होती. १२ वी नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता. सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी २२ तारखेला सोनूली येथे आली होती.