शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावर बारदाना पोहचला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:22 IST

आधारभूत धान खरेदी केंद्राला जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली. केंद्राचे विधिवत उद्घाटन मंत्र्याचे हस्ते करण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाना पोहचला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून असून याचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष खरेदी बंद : खेरदी केंद्रावर धान पडून

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आधारभूत धान खरेदी केंद्राला जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली. केंद्राचे विधिवत उद्घाटन मंत्र्याचे हस्ते करण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाना पोहचला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून असून याचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.शासनाने धानाच्या आधारभूत किंमती निश्चित केल्या आहेत. अतिरिक्त बोनसची घोषणासुद्धा केली आहे. धान उत्पादक तुमसर तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला धान विक्रीसाठी केंद्रावर नेला. परंतु अद्यापर्यंत यंत्रणा सक्रीय झाली नाही. वाहनी केंद्रावर शेकडो पोते धान विक्रीसाठी आला आहे. परंतु प्रत्येक्षात बारदाना पोहचलाच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी या केंद्राकडे पाठ फिरविली आहे.प्रशासनाने धान खरेदी करण्याची जय्यत तयारीची घोषणा हवेतच विरल्याचे सुरूवातीलाच दिसत आहे. केंद्र सरकारने धान पिकासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे शेतकरी प्रत्यक्ष धान खरेदी सुरू होण्याची प्रतिक्षा करीत आहे.वाहनी केंद्राबाबत पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. बारदान्याबाबत उत्तर विचारले मात्र त्यांनी उडवाउडवीचे आणि बेजबाबदार उत्तर दिल्याचा आरोप आहे. याविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.