शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा पोलीस मदत केंद्र दुर्लक्षित

By admin | Updated: August 2, 2014 23:57 IST

तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे केंद्र बंद अवस्थेत आहे.

जवाहरनगर : तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे केंद्र बंद अवस्थेत आहे. परिणामी परिसरात चोरांना व अवैध व्यावसायीकांना रान मोकळे झाले. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ होत होती. रस्त्यालगत असणाऱ्या गावात चोरी करणारे भामटे महामार्गावरुन पळून जात होते. अपघात, चोरी, डकेती, अपराधीत घटना झाल्यास फिर्यादींना राष्ट्रीय महामार्गापासून चार ते सहा किलोमीटर अंतर पार करुन पोलीस स्टेशन जवाहरनगर गाठावे लागत होते. परिणामी जनतेला वेळेवर योग्य न्याय मिळत नव्हते. जनतेला व महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहतुकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या बाबीची दखल घेत दिनदयाल देशभ्रतार यांच्या प्रयत्नाने २००६ मध्ये शासनाने मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार खराडी, खरबी (नाका), चिखली, ठाणा पेट्रोलपंप करीता एक बिट पोलीस हवालदार व शिपाई तर नांदोरा, शहापूर, गोपीवाडा, उमरी, फुलमोगरा, अशोकनगर अंतर्गत एक बीट पोलीस हवालदार व शिपाई आणि एक पीएसआई ची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार गृह खात्याकडून विश्रांती घेण्यासाठी व दैनिक व्यवहाराकरीता कपाट, टेबल, वायरलेस सेट आदी आवश्यक साहित्य पुरवठा करण्यात आला होता. मागील पाच-सहा महिन्यांपासून पोलीस मदत केंद्र उघडले नाही. त्यामुळे ते धुळखात पडलेले आहे. ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपने उपलब्ध करून दिलेल्या इमारतीच्या खिडक्यांची काचांची तोडफोड झालेली आहे. या ठिकाणी फक्त २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येते. याच वेळेस फक्त पोलीस मदत केंद्र सुरू करतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासठी ठाणा येथील बंद पोलीस मदत केंद्र सुरू करण्याची नितांत गरज आहे. जवाहरनगर येथे दोन एपीआय, एक पीएसआय दर्जाचे अधिकारी असून ३६ कर्मचारी आहेत. ठाणा टी पॉर्इंट हे संवेदनशिल स्थळ असल्याने येथे कायमस्वरुपी रस्ता वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)