शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

स्वच्छ भारत अभियानातून १० हजार शौचालय

By admin | Updated: June 21, 2016 00:31 IST

सततच्या होत असलेले आजार हे अस्वच्छतेमुळे होत असतात असे तज्ज्ञांचे मत आहे.

स्वच्छतेकडून समृद्धीकडे : मोहाडी तालुक्यात राबविणार उपक्रमविलास बन्सोड उसर्रासततच्या होत असलेले आजार हे अस्वच्छतेमुळे होत असतात असे तज्ज्ञांचे मत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानातून गाव पूर्णत: हागणदारीमुक्तीसाठी ठोस पाऊल पुढे उचलून मोहाडी तालुक्यात १० हजार ६९४ शौचालयाचे बांधकाम होणार आहेत.सन २०१६ - १७ वर्षात सदर शौचालय बांधकाम होणार असून यात लाभार्थ्यांना अंदाजे १२ हजार रुपये पर्यंतचा अनुदान देण्यात येणार आहे. यात बी.पी.एल. ची अट सुद्धा नाही. यासाठी पंचायत समिती मोहाडीच्या पाणी व स्वच्छता विभागाने हागणदारीमुक्त कृती आराखडा अंतर्गत प्रत्यक्ष गावातील नागरिकांना भेटून सदर योजनेचे उद्दीष्ट, महत्व व त्याचे फायदे याविषयी माहिती देतात. तसेच गावात असलेल्या शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी यांची पाहणी करतात. मोठे शौचालय नसल्यास शौचालयासाठी प्रस्तावित करतात. गावातील तुटफूट झालेल्या नाल्या त्यावरचे झाकण यांची सुद्धा पाहणी करतात. तसेच योग्यवेळी सल्लाही देतात.त्यांच्या या गृहभेटीतून स्टीकर लावून शौचालय बांधकाम प्रोत्साहन करण्याचे काम सध्या सुुरु आहे. यात लाल, हिरवा, पिवळा, शेंद्री या स्टीकरचा उपयोग घराला लावाताना दिसतात. यात लाल रंगाचा स्टीकर ज्या घरावर आहे त्याचा अर्थ ज्यांच्याकडे शौचालय नाही असा होतो. ज्यांच्या घावर हिरव्या रंगाचा स्टीकर आहे त्याचा अर्थ त्यांच्याकडे शौचालय आहे असा अर्थ निघतो. ज्यांच्या घरावर पिवळ्या रंगाचा स्टीकर आहे त्याचा अर्थ शौचालय घरी आहे पण वापर अर्धे करतात अर्धे वापर करत नाही. ज्या घरावर शेंद्री रंगाचा स्टीकर आहणे पण मोडकळीस आहे असा अर्थ निघतो. सध्या ग्रामीण भागात असे स्टीकर लावलेले दिसतात.ऐन पावसाळा तोंडावर असताना व शेतकऱ्यांचे शेतीचे कामे सुरु असताना सुद्धा लाभार्थ्यांनी शौचालयासाठी खड्डे खोदकाम सुरुवात केली आहे.स्वच्छ भारत अभियानातून शौचालय बांधकामासाठी आम्ही गृहभेटीतून यांचे महत्व समजावून सांगतो. तसेच ज्या लाभार्थ्यांना शौचालय पाहिजे असल्यास तसा तो शौचालयासाठी प्रस्तावित करतो.- पी.व्ही. गणवीरसमन्वयक पाणी व स्वच्छता विभाग पं.स. मोहाडी.