शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चार एकरात घेतले दहा लाखांचे भेंडीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:49 IST

तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील एका मॅट्रीक उत्तीर्ण युवकाने वर्षातून दहा महिने ९० मजुरांच्या हाताला शेतीत काम देऊन...

परजिल्ह्यात वाढली मागणी : वर्षभर १०० मजुरांना काम देण्याचा संकल्प, रेंगेपारच्या तरूण शेतकऱ्याची यशोगाथामोहन भोयर  तुमसरतुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील एका मॅट्रीक उत्तीर्ण युवकाने वर्षातून दहा महिने ९० मजुरांच्या हाताला शेतीत काम देऊन एक आदर्श प्रस्थापित केला आहे. गावात त्याला रोजगार हमी योजना असे नाव दिले असून येणाऱ्या पुढील काळात वर्षभरात १०० मजूरांना काम देण्याचा संकल्प केला आहे. या प्रगतीशिल शेतकऱ्याचे नाव सुभाष हिरबा निशाने (३९) रा. रेंगेपार असे आहे.सध्या सुभाष याने चार एकरात स्वत:च्या शेतीत भेंडीचे लागवड ३ डिसेंबर २०१५ ला केली होती. भेंडीचा प्रथम तोडा १० फेब्रुवारी २०१६ ला निघाला. प्रथम तोड्यात अडीच क्विंटल भेंडी निघाली. एक दिवसाआड १५ क्विंटल भेंडीचे उत्पादन निघत असून एका आठवड्यात ४५ क्विंटल भेंडी उत्पादन होते. सध्या भेंडीचा प्रति किलो २० ते २२ रुपये आहे.सहा पुरुष मजूर व ४१ महिला मजूर सुभाषकडे कामाला जातात. पुरुषाला प्रति दिवस २०० रुपये मजुरी तर महिलांना चार तासांचे ६० रुपये मजूरी दिली जाते. एका आठवड्यात ९० हजारांची भेंडी विक्री केली जाते. आतापर्यंत भेंडीचे २६ ते २७ तोडे झाले आहे. भेंडीचे पीक तीन महिने घेता येते. सुभाषने १,५७३ जे.के. जातीचे १४ किलो ग्रॅम भेंडीचे बियाणे ४५ हजार रुपयात खरेदी केले. एप्रिल महिन्यापर्यंत भेंडीचे उत्पादन घेतल्या जाणार आहे.एका आठवड्यातून दोनदा भेंडीला पाणी दयावे लागते. सुभाष ७० ते ८० हजार खतावर खर्च करावा लागला. भेंडी विक्री करिता गोंदिया येथील बाजारपेठेत नेली जाते. भेंडी रुचकर असल्याने गोंदिया बाजारपेठेत ही भेंडीला मोठी मागणी आहे.१० एप्रिलपर्यंत दुसरे काकडीची शेती ५ एकरात सुभाष लागवड करणार आहे. याकरिता ४० हजारांचा खर्च अपेक्षीत आहे. मे महिन्यापर्यंत काकडीचे उत्पादन घेता येणार आहे. यातून अडीच ते ३ लाखांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. वांगी, भेंडी व नंतर काकडी शेत पिकावर ४० मजूर तर ऊस लागवडीवर ५० मजूर असे ९० मजूर १० महिने सुभाषकडे कामे करतात.सुभाषकडे स्वत:ची १२ एकर शेती असून ३४ एकर शेती तो भाड्याने वर्षभर करतो. गावात रोजगार नाही. रोजगाराकरिता मजूर गाव सोडून पलायन करतात. गावातच १२ महिने रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता शासनावर अवलंबूनन राहता रोजगार उपलब्ध करुन देण्याचा संकल्प सुभाष याने केला आहे. शासन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वर्षातून ९० दिवस कामे उपलब्ध करुन देते, सुभाष त्याही पलीकडे जाऊन विचार करीत आहे.हेवा वाटावा असे काम शेती परवडत नसतांनी सुभाषने हाती घेतले व त्यात तो यशस्वी होत आहे. कृषी विभागाच्या आत्मा या संस्थेचा तो सदस्य आहे. पंरतु प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या बांधावर मात्र कृषी विभागाचे अधिकारी भेट देत नाही ही खरी शोकांतीका आहे. सुभाष यांची मजूरांप्रती तमळळ वाख्याण्यासारखी आहे, पंरतु भरघोष शेती उत्पादन घेण्याकरिता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर भेट देऊन आधूनिक पध्दतीने पीक कसे घेता येईल याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे.- हिरालाल नागपुरे, गटनेता, पंचायत समिती, तुमसर