शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार अधिकाऱ्याने केला ‘सीम कार्ड’चा गैरवापर

By admin | Updated: August 3, 2014 23:09 IST

बीएसएनएलच्या सीमवरुन जातीय तेढ निर्माण करणारे अश्लिल एसएमएस पाठविण्यात आले. या प्रकरणी बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी शफी इस्माईल शेख यांच्यासह तिघांवर साईबर क्राईम अंतर्गत

भंडारा : बीएसएनएलच्या सीमवरुन जातीय तेढ निर्माण करणारे अश्लिल एसएमएस पाठविण्यात आले. या प्रकरणी बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी शफी इस्माईल शेख यांच्यासह तिघांवर साईबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक विकास मदनकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.नगरसेवक मदनकर यांच्याकडे बीएसएनएलचे सीमकार्ड आहे. २४ जुलैला त्यांचे सीमकार्ड दुपारच्या सुमारास अचानकपणे बंद पडले. याबाबतची त्यांनी २५ जुलैला बीएसएनएल कार्यालयाकडे सकाळी तक्रार नोंदविली. दरम्यान त्यांचा तो सीम बीएसएनएलचे एस.डी.ओ.टी. शफी इस्माईल शेख यांनी जाणीवपूर्वक बंद करुन त्याच नंबरचा दुसरा सीमकार्ड सुरू केला. व त्या नंबरवरुन विकास मदनकर यांना पूर्वकल्पना न देता शेख यांनी स्वत:च्या सीमकार्डवर अश्लिल तथा जातीवाचक शिविगाळ असलेले एसएमएस पाठविला. या एसएमएसमुळे समाजात तेढ निर्माण करुन मदनकर यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचा या मागचा शेख यांचा मनसुबा होता, असा आरोप मदनकर यांनी केला आहे. यानंतर मदनकर यांनी शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत शेख यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करुन लिपीक एम.जे. खान व नियमीत मजूर लीलाधर डेकाटे यांना हाताशी धरुन कटकारस्थान केल्याचा आरोप केला आहे. याबाबत भंडारा पोलीस स्टेशन, दूरसंचार मंत्रालय, पोलीस अधीक्षक, सायबर क्राईम सेल आदींना निवेदने पाठवून शेख यांच्यासह तिघांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)