शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी केला राज्य प्राथमिक ‘संघात’ प्रवेश

By admin | Updated: March 27, 2016 00:28 IST

जिल्ह्यात कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांमध्ये होत असलेल्या गळचेपीने अनेक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला आहे.

भंडारा : जिल्ह्यात कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांमध्ये होत असलेल्या गळचेपीने अनेक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला आहे. मोहाडी येथे २१ तर पवनी येथे नऊ शिक्षकांनी प्रवेश घेतला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात संघाने शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी रेटून न्याय मिळवून दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची त्यांच्या संघात होत असलेल्या कुंचबनेमुळे तथा न्याय मिळत नसल्याने अनेक शिक्षकांनी सय्यद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघात प्रवेश केला आहे. पवनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची कोंढा येथील अक्षय सभागृहात सभा घेण्यात आली. यावेळी नऊ शिक्षकांनी संघाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतला. यात रवी नखाते, प्रदीप कावळे, विलास शेंडे, कोमल घाटोळकर, लोमेश कोल्हे, हरिदास सावरबांधे, भगवान शेंडे, संतोष गुट्टे, डी. एन. शेंडे यांचा समावेश आहे. यावेळी रमेश लोणारे, रमेश नागपुरे, के. डी. भुरे, संजीव बावणकर, केशर माथुरकर, महेश गावंडे, उत्तम कुंभारगावे, मकरद घुगे, उमाजी देशमुख, विकास गायधने, दिलीप बावणकर, सुधिर वाघमारे, यामिनी गिऱ्हेपुंजे, राम पवार आदी शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)मोहाडी : पंचायत समितीच्या प्रांगणात धर्मार्थ प्याऊचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद युवराज वणवे, अनिल गयगये उपस्थित होते. यावेळी कार्यरत शिक्षकांच्या एका संघटनेत २१ शिक्षकांनी संघात प्रवेश केला. यात गोपाल निमजे, मनोहर बडवाईक, डी. जी. काळे, राजेश भोयर, अजय शहारे, लिलाधर माने, घनशाम पराते, पी.बी. कंगाले, शिवराज राठोड, संजय जाधव, गणेश धांडे, धोंडीराम हाके, संजय गजभिये, आर. टी. कुंभरे, डी. झेड. सरांडे, प्रेमराज बावनकुळे, कमलेश दुपारे, विनोद दुबे, वसंता चिंधालोरे, के. बी. गजभिये यांचा समावेश आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दिनेश गायधने, बाळासाहेब आंधळे, प्रकाश महालगावे, किशोर डोकरीमारे, सोनीराम मेश्राम, राजकुमार चांदेवार, नरेंद्र कोहाड, पी.के. कस्तुरे, राजकुमार मेश्राम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)