शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:14 IST

खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा जिल्हा भंडाराच्या शिष्टमंडळाची तक्रार निवारण सभा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल.एल. पाच्छापुरे यांच्या दालनात शनिवारला पार पडली. यावेळी संघटनेनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या निकाली काढण्याचे सकारात्मक आश्वासन शिक्षणाधिकारी एल.एस. पाच्छापुरे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : खासगी प्राथमिक शिक्षक संघाची तक्रार निवारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा जिल्हा भंडाराच्या शिष्टमंडळाची तक्रार निवारण सभा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल.एल. पाच्छापुरे यांच्या दालनात शनिवारला पार पडली. यावेळी संघटनेनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या निकाली काढण्याचे सकारात्मक आश्वासन शिक्षणाधिकारी एल.एस. पाच्छापुरे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.शिक्षकांचे नियमित वेतन एक तारखेला अदा करणे, वेतन देयकासोबत अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करणे, सत्र २०१८ - १९ च्या संच मान्यतेनुसार रिक्त व अतिरिक्त पदाची माहिती प्रकाशित न करता समायोजन कार्यशाळा घेण्यावर संघटनेनी नाराजी व्यक्त केली असून जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत एकुण २९ जागा रिक्त आहेत व केवळ ११ शिक्षक अतिरिक्त झाले. त्यामुळे बिंदू नामावलीनुसार समायोजनाची कारवाई करावी, पंचशील प्राथमिक शाळा भागडी येथील प्रभारी मुख्याध्यापक रामचंद्र मेश्राम नियत वयोमानानुसार दि. ३० नोव्हेंबर २०१६ ला सेवानिवृत्त झाले. मात्र दोन वर्षाचा कालावधी होऊन देखील संस्थेने पेंशन प्रकरण सादर केले नाही. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचे पेंशन प्रकरण त्वरीत निकाली काढणेकरिता सचिव तथा मुख्याध्यापक यांना आदेश देण्यात यावे, शिक्षणाधिकारी यांचे आदेशाची अवहेलना करणाºया मुख्याध्यापकाची शिक्षक पदाची मान्यता रद्द करावी अशी संघटनेची तीव्र भूमिका आहे. दि.१२ डिसेंबर २०१८ पर्यंत पेंशन प्रकरणी निर्णय घेण्याचे शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले.सत्र २००७-०८ मध्ये समायोजनाद्वारे पा.वा. नवीन मुलींची शाळा भंडारा येथे रूजू झालेल्या वनिता खोकले व शामली नाकाडे यांचे मूळ शाळेतील स्थगित वार्षीक वेतनवाढी मंजूर करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रूजू झालेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना जुनी पेंशन लागू असल्याने त्यांचे डीसीपीएस खातेवरील रक्कम जीपीएफ खातेवर वळते करावे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणी जिल्ह्यातील पात्र शिक्षकांची अद्यावत माहिती वेतन देयकासोबत सादर करण्याचे आदेश द्यावे, सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांची ग्रॅच्युएटी धनादेशाद्वारे न देता आरटीजीएस नुसार त्यांचे खातेवर वळते करावे, सत्र २०१२ -१३ पासूनची संच मान्यता दुरुस्तीचे आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेली प्रकरणे व निकाली काढलेली प्रकरणाची माहिती करविणे शालेय पोषण आहार मानधन नियमित देण्याची कारवाई करावे, तसेच माहे आॅगस्ट २०१८ पर्यंतचे इंधन व भाजीपाला मानधन शाळांच्या खातेवर वळते केले असून माहे आॅक्टोबरची प्रक्रिया सुरु आहे. अल्पसंख्यांक शाळा व रिक्त अतिरिक्त पदे तसेच नियुक्तीबाबतची माहिती देण्यात यावे, २० टक्के अनुदान टप्प्यावरील ममता प्राथमिक शाळा येरलीचे अनुदान वितरीत करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे, आरटीईनुसार शाळांना एक वर्षाची मान्यता न देता सलग तीन वर्षाची मान्यता देणे आदी विषयावर चर्चा झाली.सभेला उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे, खासगी प्राथमिक संघ नागपुरचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर, केंद्रीय सचिव विजय नंदनवार, कार्याध्यक्ष रहेमततुल्ला खान, कोषाध्यक्ष गोपाल मुºहेकर, शहर कार्याध्यक्ष संजय बोरगावकर, शहर सचिव मोहन सोमकुवर, ग्रामीणचे ज्ञोनश्वर खंगारे, विमाशीचे संघटक तेजराम राजूरकर, संघटनेचे मार्गदर्शक राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण, सचिव विलास खोब्रागडे, तालुकाध्यक्ष कुणाल जाधव, तालुका सचिव विवेक मानकर, कार्याध्यक्ष धनवीर कानेकर, प्रभाकर मेश्राम, रुपेश नागलवाडे, सुनील मेश्राम, प्रेमलाल मलेवार व रामचंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.