शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक धडकले जि.प.वर

By admin | Updated: July 14, 2016 00:34 IST

जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांच्या मे महिन्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या बदली आदेशांना स्थगिती मिळाली.

प्रकरण शिक्षक बदलीचे : शिक्षकांअभावी शाळा पडल्या ओस भंडारा : जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांच्या मे महिन्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या बदली आदेशांना स्थगिती मिळाली. मात्र त्या आदेशाचे पालन न झाल्याने जिल्ह्यातील शिक्षक बदलीच्या ठिकाणी अद्यापही रूजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना योग्य ठिकाणी सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारला सुमारे २०० शिक्षक जिल्हा परिषदेत धडकले. मे महिन्यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय झाल्याचे प्रकरण पुढे आले. त्यामुळे अनेक शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, राज्य शासनाने शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगिती दिली. मात्र या बदली प्रकरणाची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी घेतली नव्हती. त्यामुळे बदली झाल्यानंतरही शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या संपूर्ण बदली प्रकरणांची चौकशी होईपर्यंत शिक्षक नवीन ठिकाणी रूजू झाले नाही. बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने काही शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी रूजू करून घेतले तर अनेकांना रूजू करण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून अनेक शिक्षकांची बदली अधांतरी राहिली आहे. याबाबत बुधवारला २०० शिक्षक जिल्हा परिषदेत धडकले. अ.वा.बुद्धे, सुधीर वाघमारे, आनंदराव गाढवे, श्रावण लांजेवार, राधेश्याम आमकर, देवदास भुते, केशव भगत, सी.पी. मोेरे, गुलाब आव्हाड, भूमेश्वरी येळणे, शकुन चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत धडकले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, विनायक बुरडे यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)