शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर बाजार समिती लावणार ‘चेकपोस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:24 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक लुट होऊ नये तथा परप्रांतीय व्यापारी बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करण्यापासून रोखण्याकरिता ....

११ चेकपोस्टचा समावेश : बांधावर शेतमाल खरेदी करू शकणार मोहन भोयर तुमसर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक लुट होऊ नये तथा परप्रांतीय व्यापारी बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करण्यापासून रोखण्याकरिता व बाजार समितीला सेसचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर व मोहाडी तालुक्यात ११ चेकपोष्ट लावणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सहकार व पणन मंत्रालयालाकडे सादर करण्यात आला आहे.तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती धानाकरिता विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील बाजारपेठेत धानाची विक्रमी आवक होते. परंतु तुमसर व मोहाडी तालुक्यात परप्रांतीय व्यावसायिक व पश्चिम विदर्भातील व्यावसायीक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धानासह इतर शेतीमाल खरेदी करीत आहेत. यात शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. यात त्यांची आर्थिक लूट केली जाते. बाजार समितीला दरवर्षी लाखोंच्या सेसपासून मुकावे लागत आहे. त्यातून मार्ग काढण्याकरिता तथा नियमबाह्य खरेदी रोखण्याकरिता तुमसर बाजार समितीने सहकार व पणन मंत्रालयाला परवानगी मागितली आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यात ११ चेकपोष्ट लावण्याची परवानगी सहकार खाते, महसूल विभाग, वनविभाग, जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक कार्यालयांना मंजुरी मागितली आहे. मंजुरीनंतर ११ चेकपोष्ट येथे लावण्यात येणार आहेत. चेकपोष्ट लावण्यामागील कारणासह बाजार समितीने संबंधित कार्यालयांना माहिती सादर केली आहे. चेकपोष्ट लावल्यानंतर परप्रांतीय तथा इतर व्यापाऱ्यांना बांधावर जाऊन तथा शेतकऱ्यांकडून सरळ धान्य खरेदी करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत शेतमाल विक्री करावे लागणार आहे. या चेकपोष्टवर बाजार समितीचे कर्मचाऱ्यांचे तपासणी पथक तैनात करण्यात येणार आहे.तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतमाल आॅनलाईन खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध असून बाजारपेठेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे. येथील सभापती, उपसभापती तथा संचालक मंडळ या बाजार समितीला क्रमांक एकची बाजार समिती कशी होईल या दिशेने प्रयत्नरत आहेत.शेतकऱ्यांना शेतमालाचे रास्त भाव मिळावा, आर्थिक लुट होऊ नये व बाजार समितीला सेस पासून मुकावे लागू नये, याकरिता नियमानुसार तुमसर- मोहाडी तालुक्यात ९ ते ११ चेकपोस्ट लावण्याकरिता संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.-अनिल भोयर,प्रभारी सचिव, तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर.