साकोली : पावसाळ्यात पाऊस बेपत्ता झाल्याने वातावरणात तापमानाने कहर माजविला. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या साकोली तालुक्यात वायरल तापाची साथ सुरू असून साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयांमध्ये तापाचे व डेंग्यु आजाराचे रुग्ण भरती आहेत.सध्या साकोली तालुक्यातील बऱ्याच गावात ताप साथ सुरू असून रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण कमी होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तापाबरोबरच डेंग्यूचीही लागण होत आहे. साकोली उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही वॉर्ड रुग्णांच्या गर्दी भरले आहेत. वेळप्रसंगी जमिनीवर बेड लावून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.साकोली तालुक्यातील परसोडी येथेही मागील एक महिन्यापासून डेंग्यूची साथ सुरूच आहे. येथे दोन बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कुठलाही ताप आल्यास त्वरीत रुग्णाला दवाखान्यात असा सल्ला आरोग्य विभाग देत आहे. मागील २० दिवसंपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. उन्ह सावल्याच्या खेळ सुरू आहे. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोली तालुक्यात तापाची साथ
By admin | Updated: August 23, 2014 01:30 IST