शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली शिवारफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:05 IST

शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार नवनवे तंत्र अवगत व्हावे याकरिता तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या.

ठळक मुद्देदशपर्ण औषधांचे प्रात्यक्षिक : ठिंबक योजनेचे शेतकऱ्यांना सांगितले महत्त्व

आॅनलाईन लोकमतपालांदूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार नवनवे तंत्र अवगत व्हावे याकरिता तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या.शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या उसमस्यांची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत उपस्थितीत प्रश्नांना यथोचित उत्तरे देत शेतकऱ्यांच्या वास्तव प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी शेतकरी गोकुल राऊत यांनी फुलकवलेली ब्रोकोली, मल्पिंगवर भेंडी, ठिंबकच्या आधारे लावलेली बाग यावेळी सगळ्यांना आकर्षणाचे केंद्र ठरले. शिवारफेरीत तालुका कृषी अधिकारी पी.पी. गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके, कृषी पर्यवेक्षक शिल्पा खंडाईत, चुडामन नंदनवार, यांच्यासह विजय ब्राम्हणकर, श्रीपत द्रुगकर, रुपेश भुसारी, शिवाजी कोरे आदी शेतकरी उपस्थित होते.यावेळी दशपर्ण अंकीत शेळी न खाणारी वनस्पती, पाने, गावरान गाईचे गोमुत्र व शेण यांचे मिश्रण ३० दिवस पाण्यात कुजत ठेऊन दररोज घोळत गुणकारी औषध तयार होते. हे २०० लिटर पाण्यात प्रती एकरात स्प्रे पंपाद्वारे फवारणी करावी. यामुळे पिकांचे पूर्णपणे संरक्षण होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.ठिंबक सिंचनात ७० टक्के पाण्याची बचत शक्य असून कमी पाण्यात व्यवस्थित पीक व्यवस्थापन शक्य असल्याचे माल्चींग वरील भेंडी पिकाच्या प्रात्यक्षिकावरून समोर आले. नवीन कृषीतंत्रज्ञान स्वीकारत शेतकºयांनी पुढे यावीत. यामुळे शेतात लक्ष्मीचे दर्शन होत आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज निर्माण होणार नाही. दिवसेंदिवस भूजलसाठा कमी होत आहे. शासनाने एका एकराकरिता ठिंबकचे नियोजन केले आहे.प्रत्येक बागायती शेतकऱ्यांनी पाटाच्या पाण्याची बागायती न करता ठिंबकची शेती करावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी पी.पी. गिदमारे व मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांनी केले.कृषी अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.शेतकऱ्यांना पुस्तिका अभ्यासापेक्षा कृषीतून पिकांची वास्तव माहिती पुरवा. ठिंबक सिंचन योजनेत शासनाचा वाटा वाढून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवाची निश्चित खात्री गरजेची असते. बहुधा योजना कंत्राटदाराच्या माथी मारून शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा लाभ घेतला जातो. ठिंबक मध्ये वापरत येणारी न्याहरीन (वेल पाईप लाईन) उत्कृष्ट दर्जाची हवी.-बळीराम बागडे, प्रगतशील शेतकरी पालांदूरकृषी अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन कामात कमी लक्ष पुरवित शेतकरी हप्ताभरात किमान तीन दिवस मार्गदर्शन करावे. दरमहा पिकात, हवामानात बाजार होणारी अदलाबदल विषयी माहिती पुरवावी. पालांदूर परिसरातील शेतकरी होतकरू असून पाठीवर थाप मारीत लढ म्हणण्याची प्रेरणादायी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.-विजय ब्राम्हणकर, मऱ्हेगाव, बागायती शेतकरी.