शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

लिंकिंगची खते घ्या, अन्यथा पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

भंडारा : रासायनिक खतांच्या किमती कंपन्यांनी परस्पर वाढविल्यानंतर शेतकरी व कृषी केंद्र संचालक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. दुसरीकडे ...

भंडारा : रासायनिक खतांच्या किमती कंपन्यांनी परस्पर वाढविल्यानंतर शेतकरी व कृषी केंद्र संचालक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. दुसरीकडे लिंकिंगची खते न घेतल्यास खतांचा पुरवठा बंद करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी देत आहे. याबाबत जिल्हा ऍग्रो डीलर असोसिएशनने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे निवेदन देत रासायनिक खतांची दरवाढ मागे घेण्यासोबतच लिंकिंगची सक्ती करू नये, अशी मागणी केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, मे महिन्यात कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे कारण पुढे करीत रासायनिक खते व इतर कंपन्यांनी खताची दरवाढ केली होती. त्यामुळे एक खताच्या गोणीमागे ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. २० मेपासून कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खताच्या कमी झालेल्या दराचे अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले होते. कंपनीनिहाय आणि ग्रेडनिहाय रासायनिक खतांचे दर जाहीर करण्यात आले. मात्र महिनाभराच्या आतच रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी खताच्या भावात वाढ केली. एका इंटरनॅशनल कंपनीने आपल्या कमाल विक्रीच्या किमतीमध्ये दरवाढ केली आली आहे. त्यामुळे आधी १०५० जाहीर केलेली किंमत आता या खताची विक्री ११२५ रुपये या दराने केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला कृषी केंद्र संचालकांना तोंड द्यावे लागत आहे.

एकीकडे शासनाने सर्व कंपन्यांना रासायनिक खतांचे दर ठरवून दिले असताना कंपन्या परस्पररित्या खताचे भाव वाढवित आहे. तसेच या रासायनिक खतासोबत लिंकिंगचे खते घ्यावीत, अशी सक्तीही करीत आहेत. लिंकिंगचे खत न घेतल्यास मालाचा पुरवठा करणार नाही, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे जिल्हा ऍग्रो डीलर असोसिएशनचे म्हणने आहे. यामुळे जिल्ह्यातील खत विकणाऱ्या डीलरांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. रासायनिक खत पुरवठा कंपन्यांची मुजोरी वाढत असल्याचेही ॲग्रो डीलर असोसिएशनने म्हटले आहे. यासंदर्भात असोसिएशनने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करीत रासायनिक खतांची दरवाढ रोखण्याबाबत व लिंकिंग खताची सक्ती होऊ नये यासाठी कारवाईची मागणी केली आहे.

बॉक्स

बळीराजाला आर्थिक भुर्दंड

महिन्याभरातच रासायनिक खत विकणाऱ्या कंपन्यांनी खतांच्या भावात वाढ केली. याचा सरळसरळ फटका बळीराजाला पडत आहे. कृषी केंद्र संचालकही अडचणीत आल्याने त्यांना बळीराजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे सरकारने खताचे दर ठरवून दिले असतानाही रासायनिक खत विकणाऱ्या कंपन्यांची ही मुजोरी शेतकऱ्यांनी सहन करावी काय?, आम्ही अधिकचे पैसे का बरं द्यावे असा प्रश्नही शेतकरी विचारत आहे.