शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

बियाणे, पाणीटंचाईसाठी तातडीने उपाययोजना करा

By admin | Updated: July 12, 2014 00:53 IST

संपूर्ण राज्यातील जनतेला पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते.

भंडारा : संपूर्ण राज्यातील जनतेला पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. ही संभाव्य शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारी बियाणे, पाणी टंचाईसाठी उपाययोजना आणि जनावरांसाठी चारा याचे नियोजन करावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिलेत.जिल्ह्यातील पाऊस, पेरणी, पिकांची स्थिती आणि टंचाई यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. यावेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड उपस्थित होते.यावेळी ना. देशमुख यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुदळे यांचेकडून जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती घेतली. जिल्ह्यात २ लाख हेक्टर एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी २७.८४२ हेक्टरवर धान, तुर, ऊस, सोयाबिनची पेरणी झाली आहे. १ लाख ८१ हजार ५९१ हेक्टर क्षेत्र धान पिकाखाली आहे. १६ हजार २८० हेक्टरवर पऱ्हे लागवड झाली असून केवळ ७१८ हेक्टरवर म्हणजे ०.४१ टक्के टक्के रोवणी झाली आहे. एकूण पऱ्हेखालील क्षेत्रापैकी ५० टक्के पऱ्हे करपले आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे, अशी माहिती कुदळे यांनी दिली.दुबार पऱ्हे लागवडीसाठी २० हजार ५०० क्विंटल धान बियाण्यांची मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाने बियाण्यांची उपलब्धता करावी. तसेच कमी कालावधीत येणाऱ्या धानाच्या जातीचे यावर्षी उत्पादन घेण्याविषयी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.कमी पावसाची शक्यता लक्षात घेता भविष्यात कोणत्या गावात पाणीटंचाई निर्माण होवू शकते याचा आढावा घ्यावा. ग्रामसेवक, सरपंच, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची बैठक घेऊन पाणीटंचाई निवारण्यासाठी कामांची आवश्यकता असेल तिथे पाणीटंचाई आराखडा भाग-३ मध्ये कामे मंजूर करावीत. त्याचप्रमाणे जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करा, असे त्यांनी सांगितले.पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करावी. बँकेच्या प्रमुखांची यासंदर्भात बैठक घेऊन त्याचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाव वगळणे, समाविष्ट करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. तहसीलदारांनी योग्य लाभार्थ्यांची शहनिशा करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी तहसीलदारांना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)