तुमसर : शहरातील दत्तात्रय नगरातील एका घरात एका इसमाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. प्रमोद तुकडोजी भोंगाडे (३८) असे या मृताचे नाव आहे. तपासाअंती तुमसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. दत्तात्रय नगरात प्रमोद भोंगाडे यांचे घर आहे. ते एकटेच या घरात राहत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी वलनी (पवन) येथे गेली आहे. आज सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांच्याकडे राहणारे भाडेकरू हे पिण्याच्या पाण्यासाठी मोटारपंप सुरु करण्याकरिता प्रमोद भोंगाडे यांना आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिउत्तरदिले नाही. बऱ्याच वेळानंतर त्यांनी दुजोरा न दिल्यामुळे भाडेकरूने घरात डोकावून पाहिले. त्यावेळी प्रमोद यांचा मृतदेह पलंगावर आढळला. त्यांच्या गळ्यावर जखमा होत्या. घरातील त्यांचा भ्रमणध्वनी व रोख रक्कम गायब असल्याचेही पोलिसांनी सांगितले. प्रमोद भोंगाडे हे प्राथमिक आरोग्य केंद्र लाखांदूर येथे कार्यरत होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तिवारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
इसमाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: September 22, 2014 23:13 IST