शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी केवळ दाेन व्यक्ती पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्णसंख्या हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रिल महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली आणि रुग्णसंख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात तर दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत हाेते. मृत्यूचेही तांडव सुरू हाेते.

ठळक मुद्देसक्रीय रुग्णसंख्या २९ : दाेघे काेराेनामुक्त, ८५९ जणांची चाचणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तर रविवारी केवळ दाेन व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहेत. परिणामी जिल्ह्यात आता केवळ २९ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच रविवारी ९ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत.भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्णसंख्या हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रिल महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली आणि रुग्णसंख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात तर दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत हाेते. मृत्यूचेही तांडव सुरू हाेते. सर्व भयभीत झाले हाेते. रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली हाेती. ऑक्सिजन मिळणेही कठीण झाले हाेते. अशा स्थितीत मे महिन्यापासून थाेडा दिलासा मिळायला लागला. जून महिन्यात तर काेराेना रुग्णांची संख्या अगदी कमी व्हायला लागली. ५०च्या आत काेराेना रुग्ण येऊ लागले. रविवारी ८५९ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात लाखनी व साकाेली तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळला आहे. तसेच भंडारा, माेहाडी, तुमसर, पवनी व लाखांदूर तालुक्यात रुग्ण आढळून आलेला नाही.जिल्ह्याचा रुग्ण बरे हाेण्याचा दर ९८.०५ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. गत महिनाभरापासून मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. गत काही दिवसात तर मृत्यूची नाेंद झाली नाही. मात्र आतापर्यंत ११२९ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ५१७, माेहाडी ९८, तुमसर १२९, पवनी ११२, लाखनी ९९, साकाेली १०५, लाखांदूर ६९ व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्याचा मृत्यू दर १.९० टक्के- जिल्ह्यात आतापर्यंत ११२९ व्यक्तींचा काेराेनामुळे मृत्यू झाला असून मृत्यूदर १.९० टक्के इतका आहे. जिल्ह्यात ५९ हजार ४८७ व्यक्तींना काेराेनाची लागण झाली असून त्यापैकी ५८ हजार ३२९ व्यक्ती काेराेनामुक्त हाेवून घरी परतले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या