शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

होळीपूर्वीच उन्हाचे चटके

By admin | Updated: February 22, 2017 00:32 IST

फेब्रुवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.

तापतोय ‘सूर्यनारायण’ : कमाल तापमान ३७ अंशांवरभंडारा : फेब्रुवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. मार्च महिन्याला प्रारंभ झालेला नसून होळीपुर्वीच सुर्यदेव तापू लागला आहे. उन्हाळ्यात तापमानाची काय स्थिती असेल ते यावरून दिसून येत आहे. ऐरवी होळीनंतर उष्णतेत वाढ होत असल्याचे दिसून येते. मात्र यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लवकरच लागली. वसंतऋतुच्या आगमनासोबतच उन्हाची प्रखरताही वाढू लागली आहे. १ फेब्रुवारीला वसंत पंचमी उत्सव साजरा करीत असताना तापमान ३० ते ३२ अंशांपर्यंत पोहचले होते. मात्र मागील चार दिवसांपासून घराबाहेर पडताना उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. किमान तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचल्याने मार्च व त्यानंतरच्या महिन्यात तापमानात वाढ होईल यात दुमत नाही. परंतु आजघडीला सकाळी १० वाजतापासूनच उन्हाची प्रखरता लक्षात घेता मे महिन्यात उन्हाचे चटके अधिक जाणवतील यात शंका नाही. सध्यास्थितीत फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान ३० अंशापर्यंत किंबहूना ३२ अंशापर्यंत नोंदविण्यात येते. मात्र यंदा तापमानाचा पारा ३७ अंशांपर्यंत पोहोचलेला दिसून येत आहे.होळी सणाला १९ अवधी शिल्लक असताना सुर्यदेव आतापासूनच तापायला लागला आहे. पुढील आठवड्यात १२ वी व त्यानंतर १० वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनाही वाढीव तापमानाचा सामना करावा लागणार आहे. आरोग्य विभागातर्फे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात येते.शिवरात्रीपर्वाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पावसाची हजेरी राहायची. मात्र काही वर्षांपासून ही परंपरा मोडीत निघाल्याचे दिसून येते. वातावरणातील बदल व निसर्गात मानवी हस्तक्षेप यामुळे निसर्गचक्र बदलत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा फटका वाढीव तापमान या रूपाने जाणवत आहे. दरम्यान येणाऱ्या चार महिने उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)