शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यातल्या सुमितची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:12 IST

ज्या गुणामुळे मनुष्य गगनाला गवसनी घालू शकतो, ते गुण प्रत्येकाकडेच असतातच. परंतु त्या गुणाचा विकास कसा करायचा हे तुमसर तालुक्यातील बिनाखी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुमित चंद्रशेखर गणवीर याने त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांतून सिध्द करुन दाखविले आहे. तो मल्हार फिल्म प्रॉडक्शन निर्मित वैराट या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

ठळक मुद्देचित्रपटातून झळकणार रुपेरी पडद्यावर : मुंबईतून घेतले अभिनयाचे धडे

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ज्या गुणामुळे मनुष्य गगनाला गवसनी घालू शकतो, ते गुण प्रत्येकाकडेच असतातच. परंतु त्या गुणाचा विकास कसा करायचा हे तुमसर तालुक्यातील बिनाखी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुमित चंद्रशेखर गणवीर याने त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांतून सिध्द करुन दाखविले आहे. तो मल्हार फिल्म प्रॉडक्शन निर्मित वैराट या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.सुमित चंद्रशेखर गणवीर रा. बिनाखी असे त्यांचे नाव आहे. बालपणी प्राथमिक शिक्षण बिनाखी येथील जि.प. शाळेत तर माध्यमिक शाळेचे शिक्षण सिहोरा येथे झाले. नानाजी जोशी कॉलेज शहापूर येथून पदवी घेतलेल्या सुमितला अगदी बालवया पासूनच टिव्ही पाहण्याची सवय जडली होती. अपाणही टीव्हीमध्ये काम करू, अशी इच्छा तो आपल्या पालकांकडे नेहमी व्यक्त करायचा.परंतु घरात आई, वडील व नातेवाईकांपैकी कुणालाही अभिनयाचा गंध नसल्यामुळे तसेच खेड्यापड्यात नाटकालाही वाव नसल्यामुळे तो चित्रपट क्षेत्रात जाईल, असे त्याच्या कुटुंबीयांना कधी वाटले नव्हते.मात्र त्याला चित्रपट क्षेत्रात जाण्याची आवड शांत बसू देत नव्हती. त्यामुळे ग्रॅज्युऐशनचे शिक्षण तुमसर येथे पूर्ण करुन त्याने थेट मुंबई गाठली.सतत धावणारी मुंबई पाहून त्याने मुंबईत करियर करण्याचा विचार केला व त्याने मुंबईतल्या अ‍ॅक्टिंग अकॅडमीत अ‍ॅक्टिंगचे धडे घेतले.मनात जिद्द व चिकाटीने पूर्ण वेळ मेहनत करुन अ‍ॅक्टिंग व डॉन्सींगमध्ये पारंगत झाला व त्यातच त्याला संदिप आहेर दिग्दर्शित मल्हार फिल्म प्रॉडक्शनच्या वैराट या मराठी चित्रपटात संधी मिळाली असून या चित्रपटाच्या चित्रीकराणाला ५ मार्च पासून प्रारंभ झाला असून अहमदनगर शहरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.या शिवाय सोलापूर शिरुर व कर्नाटक राज्यातही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सुमितने दिली.वैराट चित्रपटात कथा ही प्रामाणिक प्रेमावर आधारित आहे. महाराष्टÑाच्या सर्व सिनेमारसिकांना हा चित्रपट व आपली भूमिका नक्की आवडेल असा आशावादही सुमितने बोलून दाखविला आहे.