शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
4
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
5
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
6
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
7
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
8
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
9
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
10
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
11
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
12
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
13
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
14
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
15
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
16
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
17
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
18
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
19
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
20
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!

साखरेपासून गाठ्या निर्मितीला आला वेग

By admin | Updated: March 1, 2015 00:37 IST

होळी व रंगपंचमीचा सण जवळ येताच साखरेपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे.

पवनी : होळी व रंगपंचमीचा सण जवळ येताच साखरेपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. यावर्षी साखर काही प्रमाणात स्वस्त झाल्याने गाठ्याही स्वस्त राहणार आहेत.राज्यामध्ये होळी व धूलिवंदन सणानिमित्त आपल्या नात्यातील व्यक्तींना विशेषत: लहान मुलांना साखरेपासून निर्मिती केलेल्या गोड गाठ्या देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. ती आजही सुरू आहे. शहरातील घोडेघाट वॉर्डातील रविंद्र शिवरकर हे मागील १३ वर्षापासून गाठ्या निर्मितीचे काम करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी कविता व घरचे मुलेही मदत करतात.गाठ्या निर्मिती करीता मोठ्या पिंपात साखरेचा पाक तयार करण्यात येतो. या पाकामध्ये साखर, पाणी, दुध आदी घातले जाते. हा पाक मोठ्या भट्टीवर गरम केल्यानंतर हा पाक विविध प्रकारच्या साच्यात घत्तलून विविध प्रकारच्या गाठ्यांची निर्मिती केली जाते. या गाठ्या निर्मिती करण्याकरीता कानपूर, अलाहाबाद आदी ठिकाणच्या कुशल कारागिरांना आणले जाते. या कारागिरांची एक महिन्यापर्यंत राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाते. यांना एक क्विंटलमागे ४०० रूपये मजुरी दिल्या जाते. एका दिवसात दोन क्विंटल गाठ्यांची निर्मिती केली जाते. याचे त्यांना ८०० रूपये मिळतात. एक क्विंटल साखरेचा ९५ किलो गाठ्यांची निर्मिती होते. या गाठ्या २५, ५०, १००, २००, ५०० व १००० ग्रॅम वजनाच्या तयार केल्या जातात.यावर्षी काही प्रमाणात साखर स्वस्त झाल्यामुळे गाठ्या सध्या स्वस्त राहणार आहेत. पण रंगपंचमीपर्यंत भाव चढणार आहे. रवींद्र शिवरकर यांनी ६ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या गाठ्यांचे उत्पादन आतापर्यंत ५० क्विंटल पर्यंत गेलेले आहे. यावर्षी ७० क्विंटलपर्यंत गाठ्या निर्मिती होणे अपेक्षित आहे. (शहर प्रतिनिधी)