साकोली : सध्या साकोली तालुक्यातील गावात ताप, शौच व उलटीची साथ सुरु आहे. साकोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर औषधोपचार व्हावा, यासाठी आमदार बाळा काशीवार यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांची चौकशी केली.सध्या साकोली तालुक्यात ताप, खोकला, यौच व उल्टीची लागण झाली असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी आहे. त्यामुळे रुग्णांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आ.काशीवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली रुग्णांच्या सेवेसाठी योग्य औषधोपचार करावे, असे निर्देश आ. काशिवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)
उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी
By admin | Updated: September 21, 2015 00:33 IST