शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

काविळने धास्तावलेले विद्यार्थी गावाकडे परतले

By admin | Updated: August 12, 2014 23:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील ३५ विद्यार्थ्यांना काविळची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वच विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.

वसतिगृह झाले रिकामे : उपकरणांवर साचली धूळ तुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील ३५ विद्यार्थ्यांना काविळची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वच विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. सध्या वसतीगृहात एकही विद्यार्थी नाही. दरम्यान, या वसतीगृहाला भेट दिली असता तेथील उपकरणे बंद स्थितीत दिसून आले. पाणी शुद्धीकरण संयंत्र बंद होते. परिणामी दूषित पाणी सेवन केल्यामुळे त्यांना कावीळ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. शहरातील गोवर्धन नगरात भाड्याच्या इमारतीत हे मुलांचे शासकीय वसतीगृह आहे. वसतीगृहाची विद्यार्थी क्षमता ७५ आहे. शैक्षणिक सत्र सुरू होवून दीड महिना झाला तरी येथे ३९ विद्यार्थी आहेत. वसतीगृहातील विद्यार्थ्याकरीता शासनाने नानाविध सुविधा पुरविल्या आहेत. यात संगणक, खेळांचे साहित्य, सफाई यंत्र, शुद्धीकरण यंत्राचा समावेश आहे. रॉकेलवर चालणारे जनरेटरसुद्धा वसतिगृहात उपलब्ध आहे. यासर्व वस्तु सध्या बंद अवस्थेत आहेत. केवळ कागदोपत्री सुरू आहेत. या वस्तुंचा वापर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेला नाही, हे येथे विशेष. जलशुद्धीकरण संयंत्र बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत होते. अशुद्ध पाण्यामुळेच त्यांना कावीळ आजाराने ग्रासले. येथील संगणक कापडाने झाकलेले आहे. विद्यार्थी संगणक व्यवस्थित हाताळत नाही, असे सांगण्यात येते. येथील धुळ साफ करणाऱ्या यंत्रावरच धुळ साचलेली दिसून आली. जनरेटर एका कोपऱ्यात बंदस्थितीत पडून होता. अद्याप त्याची तारेने जोडणी करण्यात आलेली नाही. हा जनरेटर आतापर्यंत सुरू करण्यात आला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराला येथील गृहपाल जबाबदार आहे. कनिष्ठ लिपिकाला येथे पदोन्नती दिली आहे. अतिरिक्त प्रभार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)